Crime: दारु, पॉर्न Video अन् 32 वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत नको ते केलं!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

32-year-old woman repeatedly sexually abused a 15-year-old boy: कल्याण: एकीकडे राज्यात महिलांवर अत्याचाराचा घटना वाढत असताना दुसरीकडे कल्याणमध्ये (Kalyan) मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 32 वर्षीय महिलेने नववी शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचं (Minor Boy) वारंवार लैंगिक शोषण (sexually abused) केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला मूळची नाशिकची (Nashik) असल्याची माहिती मिळते आहे. (32 year old woman repeatedly sexually abused a 15 year old boy a horrific incident in kalyan)

ADVERTISEMENT

आरोपी महिला आणि अल्पवयीन मुलाची कशी झाली ओळख?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबासोबत कल्याणमध्ये राहतो. येथील एका इंग्रजी माध्यमातील शाळेत तो नववीच्या वर्गात आहे.

आरोपी महिला ही नाशिकमध्येच राहते. तिला दोन मुलं देखील आहेत आणि ती आपल्या पतीपासून वेगळी राहते. याच महिलेच्या जवळ पीडित मुलाची आत्या देखील राहते. या दोघींमध्ये अगदी घट्ट मैत्रीही होती. त्यामुळे पीडित मुलाची आत्या जेव्हा-जेव्हा कल्याणला यायची तेव्हा-तेव्हा ती तिच्यासोबत आरोपी महिलेला देखील घेऊन यायची. ज्यामुळे पीडित मुलगा आणि अल्पवयीन मुलाची ओळख झाली होती.

हे वाचलं का?

Crime : ‘बेस्ट फ्रेंडनेच’ केला विश्वासघात! मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

महिलेने मुलाला कसं ओढलं जाळ्यात?

दरम्यान, कधी-कधी अल्पवयीन मुलगा देखील आपल्या आत्याच्या घरी म्हणजे नाशिकला जायचा. याचवेळी आरोपी महिलेने अल्पवयीन मुलाला आपल्या जाळ्यात ओढलं. मुलाशी असलेल्या परिचयाचा तिने गैरफायदा उचलला. यावेळी महिलेने मुलाला विविध आमिषं दाखवून त्यांच्याशी जवळीक साधली.

ADVERTISEMENT

एके दिवशी महिलेने मुलाला आपल्या घरात बोलावून त्याला बेडरुममध्ये नेत सुरुवातीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर मुलाला आपल्या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून त्याचं मानसिक संतुलन बिघडवलं. यानंतर तिने मुलासोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी महिलेने निर्वस्र अवस्थेत मुलासोबतचा व्हिडीओ देखील शूट केला.

ADVERTISEMENT

यानंतर अल्पवयीन मुलाला दारूची चटक लागली. तसंच तो वारंवार फोनवरुन महिलेशी तासनतास गप्पा मारू लागला. या सगळ्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होऊ लागल्याने त्याच्या आईला त्याच्या वागण्याबाबत शंका निर्माण झाली.

असा झाला महिलेचा भांडफोड

एके दिवशी मुलाच्या आईने त्याच्या नकळत त्याचा मोबाइल तपासला. त्यावेळी तिला मोबाइलमध्ये जी गोष्ट सापडली त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मोबाइलमध्ये तिला एक व्हिडीओ मिळाला ज्यामध्ये तिचा मुलगा एका महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असल्याचं दिसून आलं.

या संपूर्ण प्रकाराने मुलाच्या आईला प्रचंड धक्का बसला. मात्र, नंतर स्वत:ला सावरत तिने या सगळ्या घटनेबाबत मुलाकडे विचारणा केली. तेव्हा त्याने आजवर झालेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला.

अल्पवयीन मुलगा दोन वर्षांपासून करत होता बलात्कार; १६ वर्षाच्या मुलीने बाळाला दिला जन्म

यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला भिवंडी शहरातील एका बालसुधार गृहात भरती केलं. जिथे त्यांचं समुपदेशन करण्यात आलं. यानंतर कोळसेवाडी पोलिसात या घटनेची तक्रार नोंदविण्यात आली. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी महिलेविरोधात बाल लैंगिक शोषण अधिनियमच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत तिला तात्काळ अटक केली. सध्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या निकिता भोईगड या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT