Aditya Thackeray नाशिकमध्ये अन् कार्यकर्ते शिंदे गटात; CM शिंदेंचा दणका

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिव संवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून (सोमवार) सुरु होतं आहे. या दरम्यान, ते नाशिक, जालना आणि औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. यातील दोन दिवस ते नाशिक जिल्ह्यात असणार आहेत. (50 senior Shiv Sainiks and activists from Nashik will join Balasaheb’s Shiv Sena party)

एका बाजूला आदित्य ठाकरे नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेना (UBT) ला मोठा धक्का दिला आहे. नाशिकमधील ५० हुन ज्येष्ठ शिवसैनिकांचा आणि कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

“Nana Patole यांच्यासोबत काम करणं अवघडं”; बाळासाहेब थोरांतांचा लेटरबॉम्ब

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोण आहेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणारे शिवसैनिक?

 • शिवाजी पालकर – माजी महानगर प्रमुख,

ADVERTISEMENT

 • राजेंद्र घुले – माजी विभागप्रमुख पंचवटी,

 • ADVERTISEMENT

 • गणेश शेलार – माजी विभागप्रमुख पंचवटी,

 • सोपान देवकर – माजी विभागप्रमुख पंचवटी,

 • रामभाऊ तांबे – मालेगाव स्टँड शाखा संघटक,

 • भाऊसाहेब निकम – माजी विभाग संघटक पंचवटी,

 • मंगेश दिघे – माजी उपविभाग प्रमुख,

 • प्रशांत जाधव – माजी उपविभाग प्रमुख,

 • राजेंद्र जोशी – माजी शाखा कार्याध्यक्ष मालेगाव स्टँड,

 • विजय निकम – माजी शाखा प्रमुख सितागुंफा,

 • मयूर जोशी – माजी शाखा प्रमुख,

 • रणजीत खोसे – माजी शाखा प्रमुख,

 • निलेश शेवाळे – माजी शाखा प्रमुख,

 • दौलत बाबू शिंदे

 • Mohan Bhagwat: जाती ईश्वराने नव्हे पंडितांनी बनवल्या, सरसंघचालकांचं विधान

  दरम्यान ज्यावेळी शिवसेना (UBT) नेते नाशिक दौऱ्यावर येतात तेव्हा शिंदे गटाकडून नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडतो, असं दृश्य मागील काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. यापूर्वी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत दोन वेळा नाशिक दौऱ्यावर आले असताना महत्त्वाचे शिलेदार हे शिंदे गटात गेले होते. आता खुद्द आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असताना दुसरीकडे ५० हून अधिक शिवसैनिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.

   follow whatsapp

   ADVERTISEMENT