महाराष्ट्रात दिवसभरात 58 हजारांपेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज, 46 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
महाराष्ट्रात दिवसभरात 58 हजार 805 रूग्ण दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 46 हजार 781 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात 816 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 58 हजार 805 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण 46 लाख 196 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.01 टक्के इतके झाले […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 58 हजार 805 रूग्ण दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 46 हजार 781 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात 816 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 58 हजार 805 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण 46 लाख 196 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.01 टक्के इतके झाले आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातले 15 जिल्हे, कोरोना रूग्ण बरे होण्याबाबत ठरत आहेत आशेचा किरण
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 1 लाख 958 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52 लाख 26 हजार 710 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36 लाख 13 हजार व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 29 हजार 417 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 5 लाख 46 हजार 129 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात 46 हजार 781 नव्या रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 52 लाख 26 हजार 710 झाली आहे.
हे वाचलं का?
Corona Vaccine : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही का होतायत मृत्यू?
दिवसभरात 816 मृत्यूंची नोंद झाली आहे त्यापैकी 387 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 193 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 236 हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू पुणे 46, नागपूर 27, बीड 22, नाशिक 21, जालना 16, नांदेड 11, भंडारा 10, अहमदनगर 9, चंद्रपूर 8, सोलापूर 8, ठाणे 8, औरंगाबाद 5, रत्नागिरी 5, रत्नागिरी 5, वाशिम 5, कोल्हापूर 4, लातूर 4, गोंदिया 3, हिंगोली 3, जळगाव 3, पालघर 3, सातारा 3, गडचिरोली 2, उस्मानाबाद 2, परभणी 2, रायगड 2, अकोला 1, धुळे 1, सांगली 1 आणि सिंधुदुर्ग 1 असे आहेत. पोर्टलनुसार ही आकडेवारी अद्ययावत करण्यात आली आहे. त्या प्रक्रियेत या मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Vaccination: लसीकरण कधीपर्यंत सुरळीत होणार?, महाराष्ट्रातील जनतेचा सवाल!
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई- 36 हजार 595
ठाणे- 31 हजार 347
पालघर – 15 हजार 317
रत्नागिरी- 10 हजार 394
पुणे- 1 लाख 3 हजार 67
सातारा- 24 हजार 80
सांगली- 19 हजार 112
कोल्हापूर- 18 हजार 863
सोलापूर- 21 हजार 455
नाशिक-22 हजार 788
अहमदनगर- 26 हजार 256
जळगाव- 11 हजार 601
बीड- 17 हजार 716
लातूर-10 हजार 54
नागपूर-49 हजार 345
चंद्रपूर- 17 हजार 639
अॅक्टिव्ह रूग्णांचा विचार केला तर पुणे आणि नागपूर या दोन शहरांमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्णसंख्या आहे. पुणे जिल्ह्यात 1 लाखांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. तर नागपुरात 49 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी होते आहे. मात्र लॉकडाऊन राज्यात आणखी पंधरा दिवस वाढणार याचे संकेत काही वेळापूर्वीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT