महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्ण झाले बरे, रिकव्हरी रेट 96 टक्के
महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 623 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 58 लाख 9 हजार 548 कोरोना रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातलं रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96 टक्के झाला आहे. दिवसभरात राज्यात 8 हजार 85 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 231 मृत्यूंचीही […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 623 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 58 लाख 9 हजार 548 कोरोना रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातलं रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96 टक्के झाला आहे. दिवसभरात राज्यात 8 हजार 85 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 231 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.1 टक्के इतका आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 13 लाख 98 हजार 501 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 51 हजार 633 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 21 हजार 377 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3 हजार 854 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 17 हजार 98 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 8085 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 60,51,633 झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण 231 मृत्यूंपैकी 156 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 75 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोव्हिड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असंही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत राजेश टोपे यांनी काय म्हटलं आहे?