पिंपरी-चिंचवड : ९ वर्षांच्या मुलाला गाडीखाली चिरडलं, आरोपी महिलेला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पिंपरी-चिंचवड परिसरातील पिंपळे-सौदागर परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत कार चालवणाऱ्या महिलेने ९ वर्षांच्या लहान मुलाला गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत महिला कारचालकाला अटक केली आहे. आरोपीचं नाव सोनल देशपांडे असं आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसाप पिंपरी-चिंचवड जवळील पिंपळे-सौदागर परिसरातील साई वास्तू या उच्चभ्रू सोसायटीत लहान मुलं क्रिकेट खेळत होती. यावेळी आरोपी सोनल देशपांडे या आपल्या गाडीने सोसायटीबाहेर जात होत्या. यादरम्यान ९ वर्षीय ऐनोश प्रदीप कसब हा मुलगा क्रिकेट खेळत होता.

क्रिकेट खेळता खेळता थकल्यामुळे थोडावेळ जमिनीवर बसला असतानाच समोरुन सोनल देशपांडे या कारने आल्या. यादरम्यान गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे ऐनोश गाडीखाली चिरडला गेला. या घटनेची माहिती मिळताच ऐनोशला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा धक्कादायक प्रसंग कैद झाला असून पोलिसांनी या प्रकरणी कारचालक महिलेला अटक केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT