Santosh Bangar: अखेर ‘त्या’ प्रकरणात आमदार बांगरांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Police Case Registered against MLA Santosh Bangar: हिंगोली: हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षाचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी 18 जानेवारी 2023 तंत्रनिकेतन महाविद्यालयात घुसून थेट प्राचार्यांना मारहाण (assaulting the principal) केली होती. या घटनेनंतर अनेक स्तरावरून आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका होत होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केली होती. अखरे या प्रकरणी बांगर यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (a case has been registered against mla santosh bangar for assaulting the principal of the college)

ADVERTISEMENT

प्राचार्य अशोक उपाध्याय यांच्या फिर्यादीवरून आमदार बांगर आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सहा शिक्षिका आणि शिक्षक यांच्या सह 40 कार्यकर्त्यांवर महाविद्यालयात प्रचार्य कक्षात जाऊन फिर्यादी आणि साक्षीदार यांना शिवीगाळ करून मारहाण केली याच बरोबर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून विविध कलमांतर्गत हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Santosh Bangar : ‘म्हणून’ प्राचार्यांना केली मारहाण; काय आहेत आरोप?

हे वाचलं का?

तंत्रनिकेतन महिविद्यालयाच्या शिक्षिका यांनी आमदार बांगर यांच्याकडे केलेली तक्रार:

तंत्रनिकेतन महाविद्याच्या शिक्षिका यांनी मिळून प्राचार्य आमच्यासोबत अश्लील भाषा वापरतात अशी तक्रार आमदार संतोष बांगर यांच्याकडे केली होती. यानंतर, आमदार बांगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन प्राचार्य अशोक उपाध्याय यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. ज्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आज हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीच्या तक्रारी वरून गुन्हा दखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीकडून बांगरांवर कारवाईची मागणी:

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोन दिवसांपूर्वी लातूर येथे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला होता. प्राचार्य, तहसिलदार, वेगवेगळे अधिकारी यांना मारहाण करणारे आमदार हे आज भारतीय जनता पक्षाच्या बरोबर काम करत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व शिंदे गट यांच्या सरकारकडून संतोष बांगर यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली होती.

‘गाडीवर हल्ला करणाऱ्यांचे एक घाव दोन तुकडे केले असते’; आमदार संतोष बांगरांचा चढला पारा

संतोष बांगर यांच्याबद्दल सत्ताधाऱ्यांची काय प्रतिक्रिया?

दरम्यान, आमदार बांगर यांचा मारहाण करतानाच व्हीडिओ समोर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून मात्र सावध प्रतिक्रिया देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सोडा तो विषय’ म्हणतं या विषयावर बोलणं टाळलं होतं. तर मला त्याबाबत माहिती नसून माहिती घेऊन बोलतो. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

मात्र, आता या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने आमदार संतोष बांगर हे पुन्हा अडचणीत आले आहेत. याआधीही त्यांनी मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकला मारहाण केली होती तर त्यानंतर पीक विमा कंपनी कार्यालयात बैठकीला अधिकारीच हजर नसल्याचे समजताच बांगर यांनी थेट कार्यालातील साहित्याची मोडतोड केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT