सात वर्षाच्या मुलीच्या गळ्यावर कोब्रा नागाचा फणा काढून डेरा, एक तास थरार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात येणाऱ्या बोरखेडी कला या गावात सात वर्षीय परी पद्माकर गडकरी या लहानशा चिमुकली मुलगी आपल्या घरी मध्यरात्री अकरा ते बाराच्या दरम्यान  गाड झोपली असता अचानक जहाल विषारी असलेल्या कोब्रा नागाने तिच्या गळ्याला वेढा घातला आणि फणा काढून डोलू लागला. त्यानंतर या मुलीला जाग आली ती किंचाळल्याने  शेजारी असलेल्या आई वडिलांना जाग आली असता डोळ्यासमोर चित्र पाहून त्यांना धक्का बसला.

ADVERTISEMENT

त्यानंतर तातडीने सर्प मित्रला पाचारण करण्यात आले तोपर्यत गावकरी तिथे पोहोचले हा सगळा प्रकार बघून सर्वजण स्तब्ध राहिलेत जवळ जवळ एक तासच्या वर हा साप त्या मुलीच्या गळ्यावर डेरा धरून बसला होता भयभीत झालेल्या मुलीची हालचाल होताच सापाने दंश केला आणि साप तिथून निघून दिवाण खाली गेला आणि दिसेनासा झाला.

हे वाचलं का?

मुलीला तातडीने सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत झडशी जवळ असलेल्या बोरखेडी कला या गावात घडलेली थरारक घटना अंगाचा थरकाप उडवणारी ठरली आहे.

ADVERTISEMENT

सध्या या मुलीवर उपचार करण्यात येत आहेत. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ही मुलगी आणि तिचे आई वडील दोघेही घाबरून गेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात येणाऱ्या बोरखेडी कला या गावात सात वर्षीय परी पद्माकर गडकरी या लहानशा चिमुकली मुलगी आपल्या घरी मध्यरात्री अकरा ते बाराच्या दरम्यान गाड झोपली असता अचानक जहाल विषारी असलेल्या कोब्रा नागाने तिच्या गळ्याला वेढा घातला आणि फणा काढून डोलू लागला. त्यानंतर या मुलीला जाग आली ती किंचाळल्याने शेजारी असलेल्या आई वडिलांना जाग आली असता डोळ्यासमोर चित्र पाहून त्यांना धक्का बसला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT