‘ऑफिसमध्ये काम न करता मी मिळवते लाखो रुपये…’, तरुणी मग नेमकं करते तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

A girl earn big sallery without doing any work in office viral story
A girl earn big sallery without doing any work in office viral story
social share
google news

ऑफिस म्हटलं तर कामाचा ताण, बॉसची कटकट आणि पगार तुटपुंजा अशी वाक्य ऐकायला मिळतात. मात्र एका तरूणीने (Girl) तर थेट या विपरीत आपला अनुभव सांगितला आहे. यासोबतच ऑफिसमध्ये (Office) काहीही काम न करता ती लाखो रूपये कमत असल्याचे सांगत आहे. तरूणीचा हा अनुभव आणि कमाई पाहून इतर ऑफिस कर्मचाऱ्यांना (office Employee) मोठा धक्का बसला आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांनी आता तिच्या ऑफिसमध्ये नोकऱी शोधायला सुरूवात केली आहे.(A girl earn big sallery without doing any work in office viral story)

ADVERTISEMENT

अमेरीकेची डॅनी रोझी ही एका मल्टी नेशनल कंपनीत काम करते. या कंपनीत ती ऑफीस मॅनेजरच्या (Office manager) पोस्टवर काम करते. या डॅनीने तिच्या टीकटॉक (Tiktok)अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती तिच्या ऑफिस आणि कामाबद्दल माहिती देत आहे. या ऑफिसमध्ये तिच्यावर अजिबात ताण नाही आहे. ती ऑफिसमध्ये आरामात काम करून पैसे कमावते आहे. तिच्या या व्हिडिओवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

हे ही वाचा : Crime: भयंकर.. तरुणीने बॉयफ्रेंडच्या आईला पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, कारण…

डॅनी रोझीचे @itsdaniirosee नावाचे टीकटॉक अकाऊंट आहे. या टीकटॉक व्हिडिओत डॅनी रोझी म्हणतेय की, मी एका कंपनीत ऑफिस मॅनेजर या पोस्टवर काम करते आहे. मी माझ काम अत्यंत प्रामाणिकपणे करते आहे. कामाची ठिकाणी मला फारसे काही काम करावे लागत नाही. त्यामुळे इतर कोणीही ही नोकरी करून आरामात पैसै कमावू शकते, असे देखील डॅनी व्हिडिओत म्हणते आहे. डॅनी रोझी पुढे म्हणते की, माझ्यावर फक्त इतकीच जबाबदारी आहे की ऑफिसमध्ये सर्व सुरळीत चालले आहे की नाही ते पाहावे. तसेच दिवसभर मिटींग करणे आणि पेपर फाईल करणे अशी सर्व कामे करावी लागतात.दरम्यान ऑफिसमधील ही सर्व कामे करून देखील तिच्याकडे खुप चांगला फावळा वेळ उरतो.या वेळेत ती तिच्या टीकटॉकसाठी व्हिडिओ बनवत असते.

हे वाचलं का?

डॅनी रोझी तिच्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहते की, मी आळशी मुलगी ऑफिस कामासाठी जन्मली आहे. मला कोणासोबतही न बोलण्याचे आणि खुप जास्त ब्रेक घेण्याची चांगली सॅलरी मिळते. तसेच जर कोणाला जर अशी नोकरी हवी असेल तर मी त्यांना मदत करेन, असे देखील डॅनी म्हणतेय.

डॅनी रोझी पुढे म्हणते आहे की, रियल इस्टेट आणि टेक कंपन्यांमध्ये ऑफिस मॅनेजरची खुप गरज आहे.तुम्ही तिकडे अर्ज करू शकता. यासोबत यांसारख्या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी रिझ्यूम कसा तयार करायचा आहे, यासाठी मी तुम्हाला मदत करेन असे देखील तरूणी चाहत्यांना आश्वस्त करत आहे. डॅनीच्या या व्हिडिओवर 16 लाखहून अधिक व्हुयज आले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी आता तिच्याकडून मदत मागायला सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : गर्लफ्रेंडला OYOवर घेऊन गेला अन् तिच्या नवऱ्याला केला Video कॉल…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT