परिस्थिती नसलेल्या आईने मोबाईल घेऊन दिला नाही; नववीत असलेल्या शुभमने गळफास लावून केली आत्महत्या
बारामती : वसंत मोरे आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नाराज झालेल्या नववीतल्या शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बारामती तालुक्यातील कऱ्हावगज मध्ये घडली. या घटनेमुळे कऱ्हावगज परिसरात शोककळा पसरली आहे. शुभम मोतीराम धोत्रे असे या मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार शुभमचे […]
ADVERTISEMENT

बारामती : वसंत मोरे
आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नाराज झालेल्या नववीतल्या शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बारामती तालुक्यातील कऱ्हावगज मध्ये घडली. या घटनेमुळे कऱ्हावगज परिसरात शोककळा पसरली आहे. शुभम मोतीराम धोत्रे असे या मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार शुभमचे वडील पूर्वीच वारले आहेत आणि त्याची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते आणि त्याचं पालनपोषण करते.
आई मोबाईल घेऊन देत नाही म्हणून लावला फास
शुभम गेली काही दिवसांपासून आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट करीत होता. पण परिस्थितीमुळे आई मोबाईल घेऊ शकत नव्हती. त्यातून निराश झालेल्या शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवचर यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.









