रेल्वे कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने विरार हादरलं; स्वत:च्याच डोक्यात झाडली गोळी
विरार : रेल्वे कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने विरार हादरले आहे. रेल्वे कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. हा रेल्वे कर्मचारी अंधेरी येथे अभियंता म्हणून काम करत होता. एका रेल्वे कर्मचाऱ्याने राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अखेर या रेल्वे कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागील कारण काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ही […]
ADVERTISEMENT
विरार : रेल्वे कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने विरार हादरले आहे. रेल्वे कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. हा रेल्वे कर्मचारी अंधेरी येथे अभियंता म्हणून काम करत होता. एका रेल्वे कर्मचाऱ्याने राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अखेर या रेल्वे कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागील कारण काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. विरार पोलिसांनी आत्महत्या केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
नितीश चौरसिया असे आत्महत्या केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते 38 वर्षांचे होते. ते विरार पश्चिम येथील राम निवास भवनच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होते. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी चौरसिया यांच्या घरी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली.
दरम्यान, आत्महत्या केलेला नितीश चौरसिया यांचा पुतण्या राजेंद्र याने या घटनेबाबत अधिक माहिती दिली. आम्ही लगेच त्याच्या घरी गेलो. त्यावेळी नितीशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांचे आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राजेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही नितीन यांना लगेच दवाखान्यात नेले. पण ते आधीच मरण पावले होते. त्यांना कसला ताण आला होता? याची आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. राजेंद्र चौरसिया यांनी सांगितले की, याशिवाय नितीश काही वैद्यकीय गोळ्याही घेत होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT