Sushant Singh Death : ‘CBI वर दबाव’ काँग्रेसचा आरोप, भाजप म्हणतं सरकार चालवण्यासाठी तुम्ही नालायक ठरलात
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या संशयास्पद मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मागच्या वर्षी याच दिवशी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला होता. सुरुवातीला मुंबई पोलीस या घटनेचा तपास करत होते, त्यानंतर सीबीआयकडे हा तपास वर्ग करण्यात आला. या प्रकरणावरुन महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामना रंगला. सुशांतच्या मृत्यूनंतर आज वर्षभरानेही दोन्ही पक्षांमध्ये […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या संशयास्पद मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मागच्या वर्षी याच दिवशी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला होता. सुरुवातीला मुंबई पोलीस या घटनेचा तपास करत होते, त्यानंतर सीबीआयकडे हा तपास वर्ग करण्यात आला. या प्रकरणावरुन महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामना रंगला. सुशांतच्या मृत्यूनंतर आज वर्षभरानेही दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.
ADVERTISEMENT
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करुन सुशांत सिंग प्रकरणात सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत सीबीआयने सत्य लपवून का ठेवलं आहे? त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचं म्हटलंय.
हे वाचलं का?
सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष, सीबीआय चौकशीला ३१० दिवस व एम्स पॅनेलने हत्येचा मुद्दा निकाली काढण्याला २५० दिवस झाले. सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे? सीबीआयवर प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 14, 2021
यावेळी अँटिलीया प्रकरण आणि सचिन वाझेंना झालेली अटक या प्रकरणावरुनही सचिन सावंत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार NIA, CBI, ED यांचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करत असल्याचं म्हटलं.
त्याचप्रमाणे जर अँटिलीया कट रचणारे वाझेसह सर्व पोलीस अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त कार्यालयातील होते तर एनआयए मास्टरमाइंडला का पकडू शकत नाही? काही गुप्त करार झाला आहे का?
परमबीर सिंग यांची चौकशी का होत नाही? एनआयएने कोर्टामध्ये जास्त वेळ मागितला आणि अद्याप काहीच का केले नाही?— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 14, 2021
जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अँटेलिया प्रकरणातील परिस्थितीजन्य पुराव्यांपेक्षा परमबीर यांच्या निराधार आरोपांना जास्त महत्त्व दिले जात आहे. मविआला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार एनआयए, ईडी व सीबीआयचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे.
परंतु अखेर सत्याचा विजय होतो हे लक्षात ठेवा— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 14, 2021
सचिन सावंत यांच्या टिकेला भाजप आमदार राम कदम यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. स्वतःच्या अपयशाचं खापर केंद्रावर कधी पर्यंत फोडणार असा प्रश्न विचारत राम कदमांनी सुशांत सिंग प्रकरणात ६५ दिवस पुरावे नष्ट करण्याचं पाप कोणी केलं असा प्रश्न विचारला आहे.
ADVERTISEMENT
स्वतःच्या अपयशाचे खापर केंद्रावर कधी पर्यंत फोडणार ? वाजे कोणाचे पाप? परमवीरसिंह यांची मुंबई पोलिसआयुक्त पदी कोणी नियुक्ती केली ? सुशांत प्रकरणात 65 दिवस कोणी पुरावे नष्ट करण्याचे पाप केले ?त्याच्या घरातील बेड पासून सर्व गोष्टी नाहीश्या करून रंगरंगोटी नव्याने करण्याचे काय कारण? https://t.co/RyotPPNqoa
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) June 14, 2021
त्याचे घर ही ताब्यात न ठेवता घाई गडबडीत मूळ मालकाला घर कोणी दिले ? घरातील फॅन पासून सर्व महत्त्वाच्या तपासाच्या गोष्टी गायब सुरुवातीच्या 65 दिवसात कोणी केल्या ? ड्रग्स रॅकेटला कोण आणि का वाचवत होते ? ज्याच्यावर गंभीर आरोप होते त्याचे प्रवक्ते बनत त्यांची वकिली कोण करत होते ?
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) June 14, 2021
स्वतः पुरावे नष्ट करायचे आणि केंद्रावर खापर फोडायचं हे धंदे बंद करा. सरकार चालवण्यासाठी तुम्ही नालायक ठरला आहात हे मान्य करा असं म्हणत राम कदमांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. दरम्यान सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झाला की घातपातामुळे याबद्दल सीबीआयनेही कोणतीही ठोस माहिती दिलेली नसल्यामुळे सोशल मीडियावर सुशांतचे चाहते तपासाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT