‘मुंबईकरांचे हाल झाले, तर घटनाबाह्य मुख्यमंत्री जबाबदार असतील’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर प्रहार
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी 5 हजार कोटी रुपये दिले असून, लवकरच कामं सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, 5 हजार कोटींच्या कामांचे टेंडर रद्द करण्यात आल्यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागलंय. मुंबईतल्या शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, “उद्योग क्षेत्रातील पाच मोठे प्रकल्प खोके सरकारमुळे […]
ADVERTISEMENT
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी 5 हजार कोटी रुपये दिले असून, लवकरच कामं सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, 5 हजार कोटींच्या कामांचे टेंडर रद्द करण्यात आल्यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागलंय.
ADVERTISEMENT
मुंबईतल्या शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, “उद्योग क्षेत्रातील पाच मोठे प्रकल्प खोके सरकारमुळे बाहेर गेले. कृषी क्षेत्रातही अशीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. खोके सरकारचं लक्ष्य राजकारणावर करत आहे”, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
“जे सत्य बाहेर आणताहेत त्यांना एचएमव्ही म्हणताहेत. जे सत्य बोलताहेत, त्यांच्यावर दादागिरी केली जातेय. मुंबईबद्दल बोलायचं झालं, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमचा फोकस होता. इतर शहरांवरही फोकस होता”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हे वाचलं का?
“मुंबई महापालिकेत दडपशाही, हुकुमशाही सुरू आहे. मुंबई महापालिकेत अधिकारी दडपणाखाली कामं करताहेत. तीन महत्त्वाच्या गोष्टी सुरू आहेत. टेंडर, ट्रान्सफर आणि टाइमपास. मुबई महापालिकेत हे सुरू आहे”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं.
“महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि खोके सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की, मुंबईतल्या रस्त्यांसाठी 5 हजार कोटी दिले जातील. 5 हजार कोटी दिल्यानंतर मुंबईतले रस्ते रातोरात खड्डेमुक्त होतील, अशी घोषणा केली होती”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
“त्यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा, शेतकऱ्यांना मदत, महाराष्ट्रात वेदांता-फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणणार, अशा घोषणा केल्या. तशीच ही एक घोषणा होती. 5 हजार कोटींचे टेंडर काढले गेले. 10-15 दिवसांपूर्वी हे टेंडर स्क्रॅप केले गेले. रस्त्याचं पुढे काय होणार, हे कुणालाच माहिती नाही”, अशी शंका आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
ADVERTISEMENT
“प्रत्येक वर्षी 2 ते अडीच हजार कोटींचे टेंडर काढले जातात. त्यातून टप्प्याटप्प्याने खर्च होतो. रातोरात खड्डेमुक्त करण्याचं सांगताहेत, त्यामुळे हे खोटं बोलताहेत. कारण एकाच वेळी सर्व कामांची परवानगी मिळत नाही. त्याचवेळी मला प्रश्न पडला होता की, हे प्रश्न बनवणार कसे आणि कधी?”, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
“5 हजार कोटींच्या टेंडरमध्ये कुणी आलं नाही की, तुमचे जे कुणी होते, ते आले नाहीत. हा वेगळा प्रश्न आहे. आता टेंडर रद्द करण्यात आलेत. आता टेंडर कधी काढणार? रस्त्याचे कामं कधी करणार? 5 हजार कोटींच्या घोषणेमुळे चालू कामंही संथ झाली आहेत. येत्या पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल झाले. अजून खड्डे पडले, तर याला पूर्णपणे जबाबदार घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील. महापालिकेचं प्रशासनही असेल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT