लिव्ह-इनमध्ये असलेल्या महिलेची भिंतीवर डोकं आपटून हत्या, हत्येनंतर आरोपी फरार

मुंबई तक

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे किरकोळ वादातून एका महिलेची भिंतीवर डोकं आपटून हत्या करण्यात आली आहे. यात मुली समोरच आरोपींनी तिच्या आईची हत्या केल्याचं आता समोर आलं आहे. सुकन्या आव्हाड असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून सुकन्या यांच्या पतीचे 7 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. सध्या सुकन्या मुलांसोबत चिंचपाडा परिसरात राहत होत्या. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे किरकोळ वादातून एका महिलेची भिंतीवर डोकं आपटून हत्या करण्यात आली आहे. यात मुली समोरच आरोपींनी तिच्या आईची हत्या केल्याचं आता समोर आलं आहे.

सुकन्या आव्हाड असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून सुकन्या यांच्या पतीचे 7 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. सध्या सुकन्या मुलांसोबत चिंचपाडा परिसरात राहत होत्या. काही दिवसांपासून सुकन्या यांचं अनिल भातसोडे याच्यासोबत परिचय वाढला होता. दोघे लग्नही करणार असल्याने त्यांच्या घरी अनिलच येणं जाणं वाढलं होतं.

अनिल हा अनेकदा सुकन्याकडे पैशांची मागणी करत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते. 12 तारखेला अनिल आणि सुकन्या यांच्यात किरकोळ वाद झाला. या वेळी अनिलने सुकन्याला बेदम मारहाण करत तिचे डोकं भिंतीवर आपटलं. हा सगळा प्रकार सुकन्या यांच्या मुलीने पाहिला.

मुलगी घराबाहेर मोबाइलमध्ये व्हिडिओ गेम खेळत असताना, तिला घरातून आईच्या ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा घरात डोकावून पाहिले असता अनिल हा तिच्या आईचे डोके भिंतीवर आपटत होता. यात सुकन्या गंभीर जखमी झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांआधीच तिचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp