राजकीय भूमिका घेतल्यामुळे अभिनेता किरण मानेला मालिकेतून काढलं? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
स्टार प्रवाह या चॅनलवर मुलगी झाली हो या प्रसिद्ध मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता किरण मानेची मालिकेतून हकालपट्टी झाल्याचं कळतंय. अभिनेता किरण माने हा नेहमी आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ओळखला जातो. अभिनयासोबत सोशल मीडियावर अनेक विषयांवर त्याने आपली परखड मतं मांडली आहे. आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणापासून ते शेतकरी आंदोलानापर्यंत अनेक विषयांवर किरण माने […]
ADVERTISEMENT
स्टार प्रवाह या चॅनलवर मुलगी झाली हो या प्रसिद्ध मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता किरण मानेची मालिकेतून हकालपट्टी झाल्याचं कळतंय. अभिनेता किरण माने हा नेहमी आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ओळखला जातो. अभिनयासोबत सोशल मीडियावर अनेक विषयांवर त्याने आपली परखड मतं मांडली आहे. आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणापासून ते शेतकरी आंदोलानापर्यंत अनेक विषयांवर किरण माने आतापर्यंत सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे. अनेकदा यासाठी त्याला ट्रोलिंगही सहन करावं लागलं.
ADVERTISEMENT
परंतू याच राजकीय भूमिका घेण्यामुळे किरण मानेला मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. काही प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीनंतर फेसबूक पोस्टच्या माध्यमातून किरण मानेने याबद्दल सूचक इशारा दिला आहे.
सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर किरण माने यांनी एक फेसबूक पोस्ट टाकत, मला कितीही संपवण्याचा प्रयत्न केलात तरी मी शांत बसणार नाही असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना किरण माने याने आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
हे वाचलं का?
आपल्या भूमिकेबद्दल किरण माने म्हणाला की, “शिवबा-तुकोबांच्या आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलं आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खरं तर खपवून घेतली जाऊ नये. माझ्या उदाहरणामधून काय घडणार आहे, हे आपण पाहूयात. यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, काय करायचंय हे लोकांनी ठरवावं. माझ्या सगळ्या पोस्ट्स वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी विखार दिसणार नाही. कुणावर विनाकारण पातळी सोडून केलेली टीका दिसणार नाही.”
यावेळी बोलत असताना किरण मानेने आपल्याला मालिकेतून बाहेर काढण्यासाठी स्टार प्रवाहच्या पेजवर कँपेन चालवण्यात आल्याचंही सांगितलं. महाराष्ट्रात असं होणार नाही असं मला वाटत होतं, हा काही यूपी, बिहार नाही. परंतू माझ्या बाबतीत हे झालंय आणि मी त्याला बळी पडलोय. मी यातून सावरण्याचा नक्की प्रयत्न करेन, मी खंबीर आहे. परंतू अभिनय क्षेत्रात झालेला हा माझा खून मी आयुष्यभर लक्षात ठेवेन असंही किरण मानेने यावेळी बोलताना सांगितलं.
ADVERTISEMENT
चाळ नावाची ‘भिकार’ वस्ती, मराठी सिनेमा चाळ संस्कृतीबद्दलचा साचेबद्धपणा कधी सोडणार?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT