न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहला मुंबई पोलिसांची नोटीस, चौकशीसाठी हजर रहावं लागणार
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या अडचणी वाढल्या आहेत न्यूड फोटोशूट प्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. रणवीर सिंह गेल्या अनेक दिवसांपासून न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंह चर्चेत आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढ झाली. मुंबई पोलिसांनी रणवीरला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता रणवीर सिंहला चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे. Maharashtra: Actor […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या अडचणी वाढल्या आहेत न्यूड फोटोशूट प्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. रणवीर सिंह गेल्या अनेक दिवसांपासून न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंह चर्चेत आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढ झाली. मुंबई पोलिसांनी रणवीरला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता रणवीर सिंहला चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra: Actor Ranveer Singh to be served notice to record his statement in connection with his nude photoshoot controversy; summoned on August 22
A team of Mumbai Police reached his residence but couldn't serve the notice as he's not present in Mumbai right now.
(File pic) pic.twitter.com/sqcXwJhAw3
— ANI (@ANI) August 12, 2022
अभिनेता रणवीर सिंहला न्यूड फोटोशूट प्रकरणात नोटीस
रणवीर सिंहला न्यूड फोटोशूट प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई पोलीस रणवीर सिंहला नोटीस बजावण्यासाठी घरी गेले होते, पण तो घरी नव्हता. त्यामुळे त्याला ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्याला चौकशीसाठी उपस्थित रहावं लागणार आहे. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
काय आहे न्यूड फोटोचं प्रकरण?
अभिनेता रणवीर सिंह याने पेपर या मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. हे फोटोशूट रणवीरला चांगलंच महागात पडणार हेच दिसतं आहे. रणवीरविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आयपीसी कलम २९२, २९३ आणि ५०९ तसंच आयटी अॅक्टच्या कलम ६७ अ च्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरच्या न्यूड फोटोशूटच्या विरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
रणवीरचं न्यूड फोटोशूट चांगलंच चर्चेत
अभिनेता रणवीर सिंग जितका त्याच्या अभिनयामुळे चर्चेत राहतो, त्यापेक्षा जास्त चर्चा असते त्यांच्या फॅशन सेन्सची. यावेळी रणवीर सिंग सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याने केलेलं न्यूड फोटोशूट! बॉलिवूडमधील उत्साही अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रणवीर सिंगने मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमी काहीतरी हटके गोष्टी करून चाहत्यांचं आणि लोकांचं लक्ष वेधून घेत असतो. नेहमी वेगवेगळ्या वेशभूषा करणाऱ्या रणवीर सिंग यावेळी जे केलंय, त्याची कुणी कल्पनाही केली नसेल आणि त्यामुळेच लोक त्यावरून जोक करत आहेत. मात्र महत्त्वाचं आहे ते दीपिका पदुकोणचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
रणवीरच्या न्यूड फोटोंबाबत काय म्हटलंय दीपिका पदुकोणने?
रणवीरचे हे फोटो पाहून मी खूपच इंप्रेस झाले. मला या फोटोशूटची संकल्पना आवडली होती. रणवीरने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी मला दाखवले होते. मला ते फोटो आवडले होते. हे दीपिका पदुकोणने म्हटलं आहे. दीपिका पदुकोणच्या या वक्तव्यानंतर त्याची खूप चर्चा होते आहे.
ADVERTISEMENT
दीपिका पदुकोणनंतर या फोटोशूटबद्दल रणवीरच्या जवळच्या व्यक्तीने इंडिया टुडेकडेही प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरच्या जवळच्या व्यक्तीने हे सांगितलं की रणवीरचे असे फोटोशूट होणार आहेत त्याचं नियोजन आधीच झालं होतं. रणवीर सिंगला या शूटबद्दल सर्वकाही स्पष्टपणे माहिती होते. तो ते करण्यास फार उत्सुक होता. रणवीर हा दररोज विविध फॅशनचे कपडे परिधान करत असतो. त्याच्या निवडीबद्दल चाहतेही त्याचे कौतुक करतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT