ऐश्वर्यासोबतच्या नात्याबाबत विचारताच शांत झाला विवेक ओबेरॉय, फक्त म्हणाला..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय या दोघांचं नातं या दोघांमधलं प्रेम फुललं होतं. मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. या दोघांचं ब्रेक अप झालं त्यानंतर विवेक ओबेरॉयचं सिनेमा करिअरही गडगडलं. ऐश्वर्या राय सोबत असलेलं अफेअर आणि त्यानंतर झालेल्या काही घडामोडी याचा परिणाम विवेक ओबेरॉयचं करिअर बरबाद होण्यात झाल्या. त्यामुळेच आता विवेक ओबेरॉयला ऐश्वर्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा तो शांता झाला.

ADVERTISEMENT

विवेक ओबेरॉय ऐश्वर्याच्या प्रश्नावर शांत

एका मुलाखतीत विवेक ओबेरॉयने त्याच्या सिनेमा करिअरबाबत प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्याने आपल्या आयुष्यातली काही गुपितंही उघड केली. याच मुलाखतीत ऐश्वर्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. जर तू करिअरच्या सुरूवातीला तुझ्या एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायसोबतचं रिलेशन पब्लिक केलं नसतंस तर बरं झालं नसतं का? असं विचारलं असता विवेक ओबेरॉय शांत झाला. त्याच्या आयुष्यातला हा अद्याय संपला आहे. विवेक ओबेरॉय म्हणाला की मी या प्रश्नाचं उत्तर देणार नाही कारण आता सगळंच संपलं आहे. मात्र युवा वर्गाला मी एक सल्ला नक्की देईन.

विवेक ओबेरॉयने युवकांना काय सल्ला दिला?

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत विवेक म्हणाला की कोणताही युवक जो टॅलेंटेड आहे त्याने एक गोष्ट कायमच लक्षात ठेवली पाहिजे की त्याने आपल्या आयुष्याबाबत आणि आपल्या करिअरविषयी फोकस्ड असलं पाहिजे. तुम्ही जे करत आहात ते १०० टक्के करा. मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही तुमचं प्रोफेशनलेझिम कायम ठेवा. प्रोफेशनेलिझमवर कुणीही अटॅक करू शकत नाही. कुणीही तुमच्या बुद्धिमत्तेवर अटॅक करू शकत नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही कुणालाही ही संधी देऊ नका की तुमच्या कामावर कुणी अटॅक करू शकेल. तुमचं टॅलेंट इतकं असलं पाहिजे की हे कुणालाही करता येणार नाही. त्यात पडू नका, तुमचा फोकस शिफ्ट करा. तुम्ही तुमच्या करिअरबाबत कमिटमेंट ठेवा असं विवेकने सांगितलं आहे.

हे वाचलं का?

विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या रॉय यांचं २००३ मध्ये ब्रेक अप

विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या रॉय यांचं २००३ मध्ये ब्रेक अप झालं आहे. विवेकने त्यानंतर हा आरोप लावला होता की सलमान खानने म्हणजेच ऐश्वर्याच्या आधीच्या बॉय फ्रेंडने त्याला धमक्या दिल्या होत्या. ऐश्वर्याला डेट करू नकोस असं सांगितलं होतं. यानंतर मोठी काँट्रोव्हर्सी झाली होती. तसंच बॉलिवूडमध्ये गदारोळ झाला होता. सलमान खान आणि विवेक ओबेरॉय समोरासमोर आले होते. विवेकने थेट सलमानसोबत भांडण केल्याने त्याचं करिअर बरबाद झालं. या सगळ्या प्रकरणानंतर विवेक ओबेरॉयने प्रियंका अल्वासोबत लग्न केलं. तर ऐश्वर्या रायचं लग्न अभिषेक बच्चन सोबत झालं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT