आर्यन खानसाठी जुही चावला जामीनदार, सत्र न्यायालयात जाऊन पूर्ण केल्या औपचारिकता
अभिनेत्री जुही चावलाने आज आर्यन खानचा जामीन भरला आहे. जामीन भरण्यासाठी कुटुंबीयांपैकी कुणी चालत नाही. फॅमिली फ्रेंड्सने जामीन भरायचा असतो त्यामुळेच जुही चावलाने हा जामीन भरला आहे. जुही चावला सेशन्स कोर्टात पोहचली असून तिने सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. जुही चावला आणि शाहरुख खान हे दोघेही रेड चिलीज एंटरटेन्मेंट या कंपनीत पार्टनर आहेत. तसंच शाहरुख […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री जुही चावलाने आज आर्यन खानचा जामीन भरला आहे. जामीन भरण्यासाठी कुटुंबीयांपैकी कुणी चालत नाही. फॅमिली फ्रेंड्सने जामीन भरायचा असतो त्यामुळेच जुही चावलाने हा जामीन भरला आहे. जुही चावला सेशन्स कोर्टात पोहचली असून तिने सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. जुही चावला आणि शाहरुख खान हे दोघेही रेड चिलीज एंटरटेन्मेंट या कंपनीत पार्टनर आहेत. तसंच शाहरुख खान आणि जुही चावला यांची मैत्रीही सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच जुही चावला आर्यन खानसाठी जामीनदार राहिली आहे. शाहरुख खानच्या जवळच्या लोकांमध्ये जुही चावलाचा समावेश होतो.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन गुरूवारीच मंजूर करण्यात आला. त्यासंदर्भातला सविस्तर आदेश आज देण्यात आला आहे. त्यामुळे जामीनदार म्हणून जुही चावला सेशन्स कोर्टात पोहचली आहे.
आर्यन खानला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यनसह तीन आरोपींना कालच मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर केला आहे. मात्र, असं असलं तरीही आर्यनसह सर्व आरोपींना जामीन आदेशातील अटी मान्य कराव्या लागणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे आर्यन देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्याला देशाबाहेर जायचे असेल तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल.
हायकोर्टाने दुपारी आर्यन खानला पाच पानी जामीन मंजूर केला. मात्र, त्याला एक लाखाची सुरक्षा ठेव भरावी लागणार आहे. न्यायालयाच्या अटींनुसार आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात जावे लागेल. तसेच न्यायालयाच्या कामकाजाबाबत आरोपी कोणतेही वक्तव्य करू शकणार नाहीत.
शाहरुख खानचा मुलगा आर्यनला जामीन मिळाल्यानंतर ‘मन्नत’ बाहेर अक्षरश: दिवाळीसारखे वातावरण आहे. सुपरस्टार शाहरुखच्या चाहत्यांना आर्यनच्या जामिनाची बातमी समजताच त्यांनी तात्काळ मोठ्या संख्येने मन्नतच्या बाहेर गर्दी केली आहे. यानंतर त्यांनी पोस्टर, फटाके आदींद्वारे आपला आनंद व्यक्त करणं सुरु ठेवलं आहे.
2 ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. यावेळी एनसीबीने आर्यन खानसह अनेक जणांना ताब्यात घेतलं होतं. ज्यापैकी काही जणांना सोडून दिलं. तर आर्यनसह अनेक जणांना अटक केली गेली. तेव्हापासून आर्यनच्या सुटकेसाठी बडे-बडे वकील जामीन मिळवण्यासाठी कोर्टात प्रयत्न करत होते. अखेर आता त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.