संजय राऊत यांच्या जामिनानंतर काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांना PMLA कोर्टाने शंभर दिवसांनी जामीन मंजूर केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीशांनी कोर्टात जेव्हा निर्णय वाचून दाखवला तेव्हा उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. शिवसेनेत अनेक घडामोडी घडल्या, शिवसेना दुभंगली त्या सगळ्या दरम्यान संजय राऊत तुरुंगात होते. आता त्यांना जामीन मंजूर झाला आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?

आज माझ्या मनात एकच भावना आहे की राजकीय लोकांना जसं सतावलं जातं आहे या सरकारकडून खोट्या केसेस मागे लावून तसंच उद्याकडे पत्रकारांनाही सतावलं जाईल. सत्य बोलण्यावर या सरकारचा आक्षेप आहे. संजय राऊत हे सच्चे शिवसैनिक आहेत. ते मुळीच झुकले नाहीत. त्यांनी सगळे आरोप सहन केले. ते तुरुंगात राहिले मात्र त्यांनी गद्दारी केली नाही. बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे सैनिक संजय राऊत आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळाला हे एक चांगलं चिन्ह आहे.

हे वाचलं का?

संजय राऊतांना जामीन मिळाला, याचा आनंद आहे. खरं बोलणारा प्रत्येक नागरिक या निर्णयाचे स्वागत करतो आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, या देशात, राज्यात आपण हुकूमाशाहीच्या दिशेने जातो आहे का? यावर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे. एकीकडे शिवसेना दुभंगली आहे. एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा सामना रोज रंगतो आहे. अशा सगळ्या घडामोडी घडत असताना संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. ३१ जुलैला संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे आता समोरच्यांमध्ये काय वातावरण आहे ते तुम्ही बघाल असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT