Tata Airbus : ४ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, उदय सामंत राजीनामा देणार का? – आदित्य ठाकरे

मुंबई तक

मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला ‘टाटा एअरबस’ हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे. लष्करी विमान निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश ही भाजपशासित राज्यही प्रयत्नशील होती. अखेरीस हा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यामध्ये होणार असल्याची माहिती आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दिली. तसंच या प्रकल्पाची पायाभरणीही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. टाटा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला ‘टाटा एअरबस’ हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे. लष्करी विमान निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश ही भाजपशासित राज्यही प्रयत्नशील होती. अखेरीस हा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यामध्ये होणार असल्याची माहिती आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दिली. तसंच या प्रकल्पाची पायाभरणीही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

टाटा एअरबसचा हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाताच शिंदे सरकार आणि उदयोग मंत्री उदय सामंत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ४ प्रकल्प महाराष्ट्रबाहेर गेले आहेत, आता तरी उद्योग मंत्री उदय सामंत राजीनामा देणार का? असा सवाल विचारला आहे.

उदय सामंत राजीनामा देणार का?

आदित्य ठाकरे ट्विट करुन म्हणाले, आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर! मी जुलै महिन्यापासून खोके सरकारकडे या टाटा एअर बस प्रकल्पासाठी प्रयत्न करण्यास सांगत होतो. मला आश्चर्य वाटतं मागील ३ महिन्यांपासून प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात का जात आहे? हा खोके सरकारने औद्योगिक पातळीवर विश्वास गमावला असल्याचा पुरावा आहे. चौथा प्रकल्प महाराष्ट्रबाहेर गेला आहे, आता तरी उद्योग मंत्री उदय सामंत राजीनामा देणार का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

तसंच डबल इंजिनचं हे सरकार असल्याचं म्हटलं जातं. पण राज्य सरकारचं इंजिन फेल आहे. आम्ही सत्तेत असताना दावोसमध्ये ८० हजार कोटी असतील किंवा कोरोनाच्या काळात देखील साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली होती. एकनाथ शिंदे दिल्लीला जातात पण ते स्वतःसाठी जातात. हे सरकार स्वत:साठी काम करत आहे, अशीही टीका आदित्य ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp