शरद पवार आणि केसीआर यांच्यात तब्बल दीड तास चर्चा, बैठकीनंतर पवार म्हणाले..
मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी आज (20 फेब्रुवारी) मुंबईत येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मुख्यमंत्री राव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी […]
ADVERTISEMENT
मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी आज (20 फेब्रुवारी) मुंबईत येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री राव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन त्यांचीही भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि चंद्रशेखर राव यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. दुसरीकडे तेलंगणातील काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते.
या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी तेलंगना सरकारचं बरंच कौतुक देखील केलं आहे. मात्र, यावेळी राजकारणाऐवजी विकासाबाबत आमची चर्चा झाली असल्याचं पवारांनी सांगितलं.
हे वाचलं का?
पाहा शरद पवार काय म्हणाले:
शरद पवार म्हणाले की, ‘आजची बैठक ही वेगळी होती कारण की, आज देशासमोर ज्या समस्या आहेत जसं की, बेरोजगारी, गरिबी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा समस्यांवर सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे यावर चर्चा झाली. आजच्या घडीला विकासाचा मुद्दा महत्वाचा असल्यानं जास्त राजकारणाबाबत चर्चा केलेली नाही. देशात कुठेही नाही असे पाऊल तेलंगणात शेतकऱ्यांसाठी उचललं आहे. त्यामुळे तेलंगणाने एक प्रकारे देशाला शेतकऱ्यांबाबत एक नवा रस्ताच दाखवला आहे.’ असं म्हणत शरद पवार यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
ADVERTISEMENT
‘तेलंगणाचे मुख्यमंत्री, त्यांचे सर्व खासदार आणि नेते हे आज आले होते. त्यांच्यासोबत फक्त विकासाच्या मुद्यावर चर्चा झालेली आहे. देशात जी गरिबी आणि बेरोजगारी आहे त्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर जास्त चर्चा झाली. विकासाच्या याच मुद्द्यावर सर्वांनी बसून त्यावर चर्चा केली पाहिजे. त्यामुळे लवकरच त्याबाबत देखील ठरवलं जाईल.’ असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
ADVERTISEMENT
…तर त्यांना भोगावं लागेल; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केसीआर यांचा भाजपला इशारा
‘लवकरच देशातील इतर नेत्यांना हैदराबादमध्ये बोलवणार’
दुसरीकडे के. चंद्रशेखर राव यांनी देखील असं म्हटलं आहे की, ‘देशाला मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. देशातील वातावरण खराब होता कामा नये. हीच आमची इच्छा आहे. आम्ही देशातील अन्य लोकांशी देखील चर्चा करु. मला वाटतं महाराष्ट्रातून जो लढा सुरु होतो तो यशस्वी होतोच. कारण सध्या जो काही अन्याय सुरु आहे त्याविरोधात आम्हाला लढायचं आहे. त्यामुळे लवकरच देशातील काही नेत्यांसोबत आम्ही एकत्र चर्चा करुन यावेळी हैदराबाद किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी ही चर्चा होईल.’ असं के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT