शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे ?, अजितदादांनी स्पष्टच सांगितलं.. म्हणाले..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत जी अभूतपूर्व फूट पडली त्यानंतर काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंच आहे. शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाला वेगवेगळं नाव आणि वेगवेगळं चिन्हही मिळालं आहे. अशात शिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याबाबत आज अजित पवार यांना विचारलं असता त्यांनीही याबाबत उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच त्यांचा रोख आहे. याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे अजित पवार यांनी रोहित पवारांच्या आरोपाबाबत?

“मी रोहितला विचारतो तू जे वक्तव्य केलं ते नेमकं कोणत्या अर्थाने केलं? त्याचा अर्थ काय आहे ते विचारतो.” असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांविषयीच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

फोडाफोडीच्या राजकारणाबाबत काय म्हणाले अजित पवार?

हे बघा फोडाफोडीचं राजकारण, फोडणं वगैरे.. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. भाजपला आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आहे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनाही तो अधिकार आहे. काय होतं कुणी आज काल या सगळ्याबाबत वेगळं काही मत व्यक्त केलं की त्याचे अर्थ काढले जातात. हे सरकार(शिंदे-फडणवीस) जेव्हा आलं तेव्हाच मला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की हे सरकार किती काळ चालेल? त्यावर मी उत्तर दिलं होतं की त्यांच्याकडे १४५ ची संख्या आहे तोपर्यंत. या माझ्या मतावर मी अजूनही ठाम आहे. तर त्याचा वेगळाच अर्थ काढला गेला. मला काय करायचं आहे त्यांच्याशी? त्यांचं त्यांना लखलाभ आणि आमचं आम्हाला.

हे वाचलं का?

रोहित पवार यांनी काय म्हटलं आहे?

ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले त्याप्रकारे पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप रोहित पवार यांनी केला. शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केल जाऊ शकतं. पण पवार कुटुंबात कुठलेही हेवेदावे नाहीत. सगळ्यांचं उद्दीष्ट स्पष्ट आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

तुमच्या आणि अजित पवारांच्या नात्यात दुरावा असल्याची चर्चा अनेकदा झाली. तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? असं विचारण्यात आलं असता रोहित पवार म्हणाले की अजित पवारांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलं. माझं लग्नही त्यांनीच ठरवलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचं असतं, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT