त्या शेतकऱ्याने पोलिसाला वाचवलं…

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

कृषी कायद्याविरोधात आंदोलनकर्ते शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव झाल्याचं मंगळवारी पहायला. मिळालं. पण त्याचवेळी आंदोलकांमध्ये अडकलेल्या एका पोलिसाला आंदोलककर्त्या शेतकऱ्यानेच वाचवलं आणि संतप्त आंदोलकांच्या गराड्यातून बाहेर काढलं.

ADVERTISEMENT

नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आज शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिसेंचं गालबोट लागलं. पोलिसांनी ज्या मार्गावरुन रॅली काढायला परवानगी दिली होती. शेतकरी दुसऱ्या मार्गावरुन दिल्ली शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.

तेव्हा शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष पहायला मिळाला आहे. पोलिस त्या मार्गाने जाऊ देत नसल्याचा दावा शेतकरी करत आहेत. त्यातच काही शेतकरी आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्या ज्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली.

हे वाचलं का?

त्याचवेळी नेमका एक पोलिस कर्मचारी आंदोलकांच्या गराड्यामध्ये अडकला. चिघळलेल्या परिस्थितीत आंदोलक पोलिसावर हल्ला करतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशातच संतप्त आंदोलकांमध्ये अकडकलेल्या पोलिसाची सुटका करण्यासाठी एका आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने धाव घेतली.

ADVERTISEMENT

पोलिसाला सुरक्षितपणे बाहेर काढताना या तरुणाला पाहून आणखी काही आंदोलक पुढे आले आणि त्या पोलिसाची सुटका झाली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT