अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरण : महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह 4 जणांना अटक
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात बुधवारी (9 नोव्हेंबर) सायंकाळी चार जणांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी […]
ADVERTISEMENT

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात बुधवारी (9 नोव्हेंबर) सायंकाळी चार जणांना अटक करण्यात आली.
आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांपैकी शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे, तर शेख आणि आनंत यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा आदेश आहे.
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात अग्नीतांडव ! ICU ला लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्यामुळे निषेध नोंदवला असून ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे.
आग प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे. शनिवारी (६ नोव्हेंबर) जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागली आहे. या दुर्घटनेत अकरा रुग्णांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा रूग्णालय अग्नितांडव: चार जणांचं निलंबन, दोन जण बडतर्फ
आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी स्वतः ही सोमवारी ही माहिती दिली होती. त्यातच मंगळवारी तोफखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी तीन जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चार आरोपींना अटक केली आहे. सदरच्या अटकेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहेत.