इम्तियाज जलील आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?; टोपेंनी केला खुलासा

मुंबई तक

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक असून, तसा प्रस्ताव आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दिला असल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटलं. याविषयावरुन महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांसह भाजपतूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर भूमिका मांडली. जलील नेमकं काय म्हणाले, याबद्दल आता राजेश टोपेंनी सविस्तर भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक असून, तसा प्रस्ताव आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दिला असल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटलं. याविषयावरुन महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांसह भाजपतूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर भूमिका मांडली. जलील नेमकं काय म्हणाले, याबद्दल आता राजेश टोपेंनी सविस्तर भाष्य केलं आहे.

माध्यमांशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, “आमच्या नेहमीप्रमाणेच गप्पा होत्या. त्यात उत्तर प्रदेश आणि इतर विषयावर चर्चा होती. त्यावेळी मी असं म्हणालो की, उत्तर प्रदेशात एमआयएममुळे १० ते १५ जागा कमी झाल्या, असा आमचा अंदाज आहे. त्यामुळे १० ते १५ जागा वाढल्या असत्या. तुम्ही असं का करता आहात? जातीयवादी पक्षांना मदत होईल, असं का वागता? तुमचं काय धोरण आहे? इतकंच मी त्यांना (इम्तियाज जलील) विचारलं.”

‘एमआयएम’ला राऊतांचा नकार, तर सुप्रिया सुळेंनी जलील यांच्या भूमिकेचं केलं स्वागत

“त्यावर ते (इम्तियाज जलील) म्हणाले की, ‘आमचं तसं काही म्हणणं नाही. आम्हाला अल्पसंख्याक समाजाचा विकास हाच आमचा मुख्य उद्देश आहे. कोणत्याही पक्षांकडून हे होत असेल, तर आम्ही ते करू,’ असं त्यांनी (इम्तियाज जलील) मला सांगितलं,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?