अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणात AIMIMची उडी, नवनीत राणांना अटक करण्याची मागणी
रोहिदास हातांगळे बीड: नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्यावरुन सतत चर्चेत असणाऱ्या, खासदार नवनीत राणांविरोधात आता एमआयएम आक्रमक झाली आहे. अमरावती येथे लव्ह जिहादच्या नावाखाली बेताल वक्तव्य करत, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न राणा यांनी केला आहे त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत बीडमध्ये एमआयएम आक्रमक झाली आहे. जर तात्काळ कारवाई नाही केली, तर एमआयएम […]
ADVERTISEMENT

रोहिदास हातांगळे
बीड: नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्यावरुन सतत चर्चेत असणाऱ्या, खासदार नवनीत राणांविरोधात आता एमआयएम आक्रमक झाली आहे. अमरावती येथे लव्ह जिहादच्या नावाखाली बेताल वक्तव्य करत, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न राणा यांनी केला आहे त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत बीडमध्ये एमआयएम आक्रमक झाली आहे. जर तात्काळ कारवाई नाही केली, तर एमआयएम रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफिक यांनी दिला आहे.
एमआयएमचे नेते शेख शफीक काय म्हणाले?
एमआयएमचे नेते शेख शफीक म्हणाले ” अमरावतीमध्ये गत काही दिवसांपूर्वीच, हिंदू-मुस्लिम दंगल झाली होती. त्यात भर टाकण्याचे काम खासदार नवनीत राणा यांच्याकडून होत आहे. महाविद्यालयीन तरुणी तिच्या वैयक्तिक कामांसाठी रेल्वेच्या माध्यमातून पुणे आणि इतर ठिकाणी गेली होती. मात्र मुस्लिम तरुणाने तिला घेऊन गेला, असं म्हणत ‘लव्ह जिहाद’चा आरोप राणा यांनी केला. मात्र हा प्रकार लव्ह जिहादचा नाही, राणा यांना केवळ जातीय दंगल घडून आणायची होती. यामुळेच त्यांनी हा खटाटोप चालवला आहे. यामुळे समाजातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार नवनीत राणा, यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. अन्यथा एमआयएम रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असा इशारा एमआयएमचे नेते बीड जिल्हाध्यक्ष शेख शफिक यांनी दिला आहे.
तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप
६ सप्टेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता तरुणीचा शोध सुरू केला होता. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी पहाटे ही तरुणी सातारा येथे आढळून आली . त्यानंतर तिला अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.