अजय देवगणचा ‘मैदान’ सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोनाने कहर माजवलाय. लॉकडाऊनमुळे शूटींगवरही परिणाम झाला आहे. अनेक सिनेमे रिलीज होण्यासाठी रखडले आहेत. तर थिएटर्स बंद असल्याने अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले आहेत. नुकतंच अभिनेता सलमान खानचा राधे हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. आता त्यानंतर अभिनेता अजय देवगनचा मैदान हा सिनेमाही ओटीटीवर रिलीज करण्यात येणार असल्याची चर्चा होती.

ADVERTISEMENT

राधे सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर अजय देवगणचा मैदान हा सिनेमाही ओटीटीवर रिजीज होणार असल्याची अफवा पसरली होती. यामुळे अजयचे चाहते देखील फार उत्सुक झाले होते. मात्र हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार नसून थिएटर्समध्येच रिलीज करण्यात येणार असल्याचं मेकर्सचं म्हणणं आहे.

या अफवानंतर फिल्मच्या मेकर्सने एक अधिकृत निवेदन जारी केलं. ज्यामध्ये म्हटलं की, मैदान हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. मेकर्स त्यांच्या निवेदनात म्हणतात, “आम्ही हे सांगू इच्छितो की सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याबाबत चर्चा झालेली नाही. मैदान सिनेमा पर व्यू रिलीज करण्याची कोणतीही योजना नाही. यावेळी आमचं लक्ष केवळ सर्वांच्या सुरक्षिततेवर आहे आणि आम्ही सर्व कोरोना नियमांचे पालन करतो. मैदानाविषयी कोणतीही माहिती मिळवण्यासाठी सर्वांनी आमच्याशी बोलण्याची विनंती करतो. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका.”

हे वाचलं का?

अभिनेता अजय देवगणची ‘मैदान’ हा सिनेमा स्पोर्ट्स बायोपिक आहे. अजय देवगणची ही पहिला स्पोर्ट्स सिनेमा आहे. या सिनेमाची निर्मीती बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणाभ जॉय सेनगुप्ता यांनी केलीये. फुटबॉल कोच सैयद अब्दुल रहीम यांच्यावरील बायोपिक आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT