अजित पवारांचा PM मोदींसह मुख्यमंत्री शिंदेना टोला, अन् कार्यक्रमात एकच हशा पिकला
Ajit pawar Criticize Pm Narendra Modi and Cm Eknath Shinde : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली होती. या त्यांच्या विधानानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला होता. अजित पवार ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या धडपड या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
ADVERTISEMENT
Ajit pawar Criticize Pm Narendra Modi and Cm Eknath Shinde : सगळयात पहिल्यांदा ज्यांनी चहा विकला ते कुठपर्यंत गेले. तसेच सगळयात पहिल्यांदा रिक्षा चालवणारे आज अय़ोध्येत पोहोचले असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली होती. या त्यांच्या विधानानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला होता. अजित पवार ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या धडपड या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. (ajit pawar criticize pm narendra modi and cm eknath shinde book publication ceremony)
ADVERTISEMENT
अजित पवार यांनी या पुस्तप्रकाशन सोहळ्यात पत्रकारावर होत असलेल्या हल्ल्यांच्या प्रकरणावर देखील भाष्य केले. महाराष्ट्रात पत्रकारांवर चौफेर हल्ले सुरू आहे, जे बिलकुल ठीक नाहीत. ह्या चौथ्या स्तंभावर म्हणजे पत्रकारांवरचे हल्ले थांबले पाहिजे असे मत त्यांनी नोंदवले. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्तीवर हल्ला किंवा संभाजीनगरमधील रॅपरवर गुन्हा अशा घटनांचा दाखला देत, राज्यात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच असे हिंसक प्रकार महाराष्ट्रात बंद झाले पाहिजेत. सर्वांनी एक जुट होऊन जर आवाज उचलला तर समोरचे बॅक फूट वर जातात , असा अनुभव आहे, असे देथील अजित पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : नॉट रिचेबल असलेले अजितदादा नेमके होते तरी कुठे?; म्हणाले, पित्त…
सगळयात पहिल्यांदा त्यांनी रीक्षा चालवली, सगळयात पहिल्यांदा ज्यांनी चहा विकला ते कुठपर्यंत गेले. सगळयात पहिल्यांदा रिक्षा चालवणारे आज अय़ोध्येला पोहोचलते,असे म्हणत त्यांनी शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली. तसे तात्या आता तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा रिक्षा चालवणारे आहात, किती जणांना वाट दाखवलीत आणि किती जणांना वाटेला लावलं असे देखील अजित पवार यांनी सांगितले.
हे वाचलं का?
कधी कधी इतका ध चा मा केला जातो,कधी काही थोडासा त्रास झाला आणि आपण थोडी विश्रांती घेतली की पेपरमध्ये त्याचे रकाने करून चौकटी करून बातम्या छापल्या जातात. इलेक्ट्रॉनिक मीडिया देखील अशा गोष्टींची माहिती न घेता तशा बातम्या देतात. अशा बातम्यांमुळे मनाला वेदना होत असतात, असे अजित पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा : शरद पवारांची अदाणींसाठी बॅटिंग, राहुल गांधींचंही प्रत्युतर… पण वेगळ्याच स्टाइलमध्ये!
दरम्यान सोने उद्धाटना दरम्यान अजित पवार यांनी नॉट रिचेबलवर उत्तर दिलं. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून प्रकृती बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो.’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT