निकाल लागू द्या, मग सांगतो पुण्यात काय घडलंय?, अजित पवारांनी दिला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ajit Pawar Speech : राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला. विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवावरून अजित पवारांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवलं. त्याचबरोबर कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. (ajit Pawar attacks bjp over chinchwad and kasba peth bypolls)

ADVERTISEMENT

अजित पवार म्हणाले, “पुण्याचा निकाल लागला ना, तर आहे ते पण जाईल. पुण्याचा निकाल काय लागेल, हे मला सांगता येत नाही, पण गिरीश महाजनांसहित सगळ्यांना तीन-तीन चार-चार दिवस बसावं लागलं ना? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किती दिवस बसावं लागलं. तिथे काय घडलं, याबद्दल आज बोलणार नाही. एकदा निकाल लागू द्या, पुण्यामध्ये, चिंचवडमध्ये काय घडलं? कोण सापडलं, कोण काय करत होतं, कोण सांगत होत की मतदानाला जाऊ नका, मतदानाला जा सांगताना काय सांगत होतं, ते आता सांगत नाही.”

अजित पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात ती निवडणूक त्यांना (भाजप-शिवसेना युती) हाताळता आलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने खूप चांगल्या पद्धतीने विरोध करण्याचं काम केलेलं आहे. ती भावनेची निवडणूक होती, पण ती आम्ही होऊ दिली नाही. कसब्यातील निकाल सातत्यानं कसा येत होता, त्यामुळे ठाण मांडून कसे बसले होते. काहींना मोक्कातून सोडल्यानंतर काही लोक कसे फिरत होते. आणखी कोण काय करत होतं? त्या खोलात आता मी जात नाही”, असा इशारा अजित पवारांनी भाजपला दिला.

हे वाचलं का?

Maharashtra Budget Live: अजित पवारांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

राज्यपालांच्या अभिभाषणावरून अजित पवारांनी सरकारला सुनावलं

“सरकारने आत्मचिंतन आत्मपरिक्षण केलं पाहिजे. जो आपला विदर्भाचा बालेकिल्ला असतानाही जागा गेल्या ही विचार करण्यासारखी बाब आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात 77 मुद्दे होते. त्यातून राज्याला काही दिशा मिळेल, काही नवी धोरणं मांडली जातील अशी अपेक्षा होती. पण, सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेण्याचं काम केलं”, असे बोल अजित पवारांनी सुनावले.

ADVERTISEMENT

“महाराष्ट्राचा कालचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा होता. पण, राज्यपालांनी सुरुवात मराठीतून केली असती, तर मराठी भाषेचा सन्मान उंचावला गेला असता. सरकारच्या प्रमुखांनी हा आग्रह राज्यपालांकडे धरायचा असतो. ती जबाबदारी सरकारची असते. उदासीन भूमिकेमुळे सगळ्यांचा भ्रमनिरास झाला”, असं अजित पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

Shashikant warishe: अजित पवारांनी दाखवली जाहिरात; देवेंद्र फडणवीस म्हणाले..

अरबी समुद्रातील स्मारकावरून भाजपवर डागली तोफ

“अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केली. पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन केलं. सत्तेचा पाच वर्षाचा काळ गेला, आता सहा-सात महिन्यांचा काळ गेला. त्या स्मारकाविषयी उल्लेखही केलेला नाही”, असा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केला.

“मुंबईत हेलिकॉप्टर सारखं फिरत होतं. त्यानंतर कळलं की, पंतप्रधानांनी कुठं, कुठं भूमिपूजनं केली, त्याची कामं कशी चाललेली आहे, हे बघण्यासाठी दिल्लीवरून हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं होत. ते दहा वेळा गेले पण कुठे स्मारकच दिसत नव्हतं. अशी काय लाट आली की? महाराजांचं स्मारक गेलं कुठे? ते पुन्हा म्हणायचे नीट बघा, तिथं साहेबांनी भूमीपूजन केलं. महाराजांचं स्मारक काही सापडलं नाही, ही तुमची अवस्था आणि काय गप्पा मारता?”, असा सवाल अजित पवारांनी भाजपला केला.

Bhaskar Jadhav: “शंभर बापाची औलाद नसशील, तर…”, मोहित कंबोज- देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज

“2014 ला छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावले आणि मतं घेतली. मतं घेण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराज तुम्हाला आठवतात, घाई घाईने का केलं भूमीपूजन की निवडणुकीची मतं पाहिजे होती. तुम्हाला माहितीये, साडेतीनशे वर्ष झाली तरी देखील महाराजांचं नाव घेतल्यानंतर उभा महाराष्ट्र नतमस्तक होतो, दैवत मानतो. आणि हेच सगळं डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करता. सांगा पहिल्या पाच वर्षात झालं नाही, आता सहा महिन्यात झालं नाही. इंदू मिलमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचाही उल्लेख त्यामध्ये नाही. त्याचंही काम थांबलेलं आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचाही विसर पडला”, असंही अजित पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT