अकोला: पोटच्या अल्पवयीन मुलीवर सलग 2 वर्ष बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धन्ंजय साबळे, अकोला: स्वत:च्या पोटच्या अल्पवयीन मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर यांनी आरोपी पित्याला जन्मठेपेसह दोन लाख 75 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

ADVERTISEMENT

माना पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील आरोपी वडिलांची स्वत:च्याच मुलीवर वाईट नजर पडली आणि आरोपीने अवघ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी करून शरीरसंबंध प्रस्थापित केले. 2017 ते 2019 दरम्यान नराधम आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.

मुलीच्या तक्रारीनुसार वडिलांविरुद्ध माना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी वडिलांविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल केलं होतं. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात याबाबतचा संपूर्ण खटला चालला.

हे वाचलं का?

यावेळी न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 8 साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी वडिलांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. भादंवि कलम 376(2) (F) (1)(N) व पॉक्सो कायदा कलम 5-6 मध्ये दोषी ठरवून न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली व कलम 376 (3) मध्ये 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली व विविध कलमांतर्गत 2 लाख 75 हजार रुपये दंड सुनावला. तसेच दंड न भरल्यास प्रत्येक कलमानुसार सहा महिन्यांची शिक्षाही सुनावली आहे.

या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने जबाब ऐनवेली बदलला होता तरीही पीडितेची साक्ष, इतर साक्षीपुराव्याच्या आधारावर आरोपीस सदर कृत्याबद्दल दोषी धरण्यात येऊन शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय खंडारे यांनी केला होता. तसेच सहायक सरकारी अभियोक्ता मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली. पोलीस कर्मचारी विजय विल्हेकर व सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून बाजू मांडली.

ADVERTISEMENT

अशी उघडकीस आली घटना

ADVERTISEMENT

गुड टच, बॅड टच’ बाबत मार्गदर्शन करताना पीडित मुलीने वडीलच तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याची बाब पोलिसांना सांगितली. तसेच तिने ही बाब तिच्या मैत्रिणीलाही सांगितली होती. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी मुलीचा रीतसर जबाब नोंदवून वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

17 वर्षाच्या मुलीवर 3 वेळा बलात्कार; ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यूंची तुरुंगवारी टळली, देणार 122 कोटी

या प्रकरणात न्यायालयात आईने पलटली होती साक्ष

दरम्यान, न्यायालयात खटला सुरू असताना सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात 8 साक्षीदार तपासले गेले यात पीडित आईचीही साक्ष महत्त्वाची होती. परंतु ऐनवेळी कोर्टात आईने साक्ष फिरविली होती. मात्र, असं असलं तरीही इतर पुराव्यांच्या आधारे नराधम बापाला कोर्टाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT