Akshay Kumar तो प्रश्न विचारताच रडू लागला; म्हणाला, ‘आजही विश्वास बसत नाही’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Akshay kumar Emotional: हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन हिरो अक्षय कुमारचा (Akshay Kumar’s Selfie Movie Release) चित्रपट ‘सेल्फी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. (Selfie Movie box office Collection) बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी फारच कमी कमाई केली आहे.(Akshay Kumar’s Flop movies) अक्षय कुमारच्या मागील चित्रपटांवर नजर टाकली तर त्याचे चित्रपट एका ओळीने फ्लॉप झाले आहेत. अक्षय कुमारसाठी 2022 हे वर्ष चांगले राहिले नाही. 2022 year not good for akshay kumar

ADVERTISEMENT

अक्षय कुमार झळकणार मराठी सिनेमात, साकारणार छत्रपती शिवरायांची भूमिका

आता 2023 मध्ये आलेला ‘सेल्फी’ हा अक्षयचा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाचा रिव्ह्यू पाहता प्रेक्षकांना तो फारसा आवडला नाही. म्हणजेच अक्षयची या वर्षाची सुरुवातही चांगली झाली नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अक्षय कुमारच्या करिअरचा हा टप्पा त्याच्यासाठी अवघड ठरत आहे. त्याचा कोणताही चित्रपट फ्लॉप झाला की त्याला त्याच्या आईने दिलेला धडा आठवतो. आजतकच्या ‘सीधी बात’ या विशेष कार्यक्रमात अक्षय कुमारने हे सांगितले.

हे वाचलं का?

मुलाखतीत अक्षय कुमारला विचारले की, तुझ्याकडे कार, बंगला, प्रसिद्धी आहे, हा जुना डायलॉग आहे, पण बघितले तर तुझ्याकडे आई नाही. तू तुझ्या आईच्या खूप जवळ होतास. ती गेली तेव्हापासून तुझा एकही चित्रपट चालला नाही. यावर अक्षय कुमार भावुक झाला.

इमोशनल झाला अक्षय

हा प्रश्न ऐकत असतानाच अक्षय आईची आठवण करून रडू लागला. त्याचे डोळे भरून आले. अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ होता. शूट संपल्यानंतर अभिनेता थेट तिच्या खोलीत जायचा आणि दिवसभरात घडलेल्या गोष्टी सांगायचा. अक्षय कुमार म्हणाला की, मी आईच्या खूप जवळ होतो. आयुष्यात आई-वडील असणे खूप गरजेचे आहे. हे पण खरं आहे की, मी तिला गमावल्यापासून माझे आयुष्य खूप बदलले आहे. ती नेहमीच माझ्या पाठीशी होती. तिचा हात नेहमीच माझ्या डोक्यावर असायचा. पण आजही माझी आई या जगात नाही यावर माझा विश्वास बसत नाहीये. आजही कितीतरी वेळा मनात येतं की आई घरी माझी वाट बघत असते. पण सत्य समोर आल्यावर माझी निराशा होते, असं भावुक होत अक्षय म्हणाला.

ADVERTISEMENT

…यामुळे देशाचं नुकसान होईल, माझी हात जोडून विनंती आहे, असे का म्हणाला अक्षय कुमार?

ADVERTISEMENT

सुधीर चौधरी यांनी विचारले की, जर ती आज तुझ्या करिअरच्या वाईट टप्प्यात असती तर ती काय म्हणाली असती? हसत हसत अक्षय म्हणाला, अनेक वेळा माझे चित्रपट असे चालले नाहीत. पण मला तिची एक प्रसिद्ध ओळ आठवते. काळजी करू नकोस बेटा, ईश्वर तुझ्यासोबत आहे. भगवान शिव तुझ्या सोबत आहेत. आताही या ओळी मला बळ देतात. हा विचार करून मी आयुष्यात पुढे जात आहे, असं अक्षय म्हणाला. अक्षयची आई अरुणा भाटिया यांचे 8 सप्टेंबर 2021 रोजी निधन झाले होते.

अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘राम सेतू’, ‘बच्चन पांडे’, ‘रक्षाबंधन’ या चित्रपटांना चांगलाच फटका बसला. या वर्षीही अक्षयचे 5 चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. म्हणजे त्याच्याकडे भरपूर चित्रपट आहेत. आता ‘सेल्फी’ रिलीज झाला आहे, त्यामुळे त्यालाही प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळत नाहीये. सुरवात खराब झाली आहे. समीक्षकांनी चित्रपटाला चांगला रिव्हिव्ह दिलेला नाही. या चित्रपटात अक्षयसोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT