Alcohol In Flights: विमानात दारू नेमकी कशी दिली जाते, काय आहेत नियम?
गेल्या काही दिवसांपूर्वी, विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एका महिला प्रवाशाच्या सीटवर लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर विमानात दारू देण्याच्या नियमांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. याबाबतचे नियम आपण जाणून घेऊयात. प्रत्येक देशातील फ्लाइट आणि एअरलाइनमध्ये दिल्या जाणाऱ्या अल्कोहोलचे नियम वेगवेगळे असतात. लघूशंका केल्याची घटना […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपूर्वी, विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एका महिला प्रवाशाच्या सीटवर लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला.
हे वाचलं का?
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता.
ADVERTISEMENT
या घटनेनंतर विमानात दारू देण्याच्या नियमांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. याबाबतचे नियम आपण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
प्रत्येक देशातील फ्लाइट आणि एअरलाइनमध्ये दिल्या जाणाऱ्या अल्कोहोलचे नियम वेगवेगळे असतात.
लघूशंका केल्याची घटना ही अमेरिकन एअरलाईन्समधील होती. अमेरिकन एअरलाइन्स ही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही फ्लाइट्मध्ये अल्कोहोल देते.
अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये प्रवास करणारे प्रवासी वाइन, बीयर, रम, वोडका, व्हिस्की खरेदी करू शकतात.
भारतीय विमान नियम 1937 च्या तरतुदी 22, 23 आणि 29 अंतर्गत, एखाद्या प्रवाशाने मद्यधुंद होऊन गोंधळ, गैरवर्तन, शिवीगाळ केल्यास त्याला विमानातून उतरवलं जाऊ शकतं.
फ्लाइटमध्ये दारू किंवा ड्रग्जच्या नशेत असणे, पायलटची आज्ञा न मानणे हे सर्व वाईट वर्तनात येतं. असं आढळल्यास प्रवाशाला उड्डाण करण्यास बंदीही घालण्यात येते.
DGCA ने फ्लाइटमधील वाईट वागणूक तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. या अंतर्गत गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशाला 3 महिने किंवा 2 वर्षांसाठी ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकलं जाऊ शकतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT