रणवीरच्या नग्न फोटोग्राफीवर आलियाने दिली अशी प्रतिक्रिया
अभिनेता रणवीर सिंह याने नुकतंच न्यूड फोटोशूट करून ते फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केलेहोते. तेव्हापासून त्याने केलेल्या न्यूड फोटोग्राफीबद्दल जोरात चर्चा सुरु आहे. अनेकांनी त्याच्या फोटोशूटचं समर्थन केलंतर काहींनी त्याला चुकीचं ठरवलं. यावर अभिनेत्री आलिया भटला प्रश्न विचारला असता तिने भन्नाट उत्तर दिलं आहे. ती म्हणाली ‘मी रणवीरच्या विरोधात काहीही ऐकणार नाही.’ आलिया […]
ADVERTISEMENT
अभिनेता रणवीर सिंह याने नुकतंच न्यूड फोटोशूट करून ते फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केलेहोते. तेव्हापासून त्याने केलेल्या न्यूड फोटोग्राफीबद्दल जोरात चर्चा सुरु आहे. अनेकांनी त्याच्या फोटोशूटचं समर्थन केलंतर काहींनी त्याला चुकीचं ठरवलं. यावर अभिनेत्री आलिया भटला प्रश्न विचारला असता तिने भन्नाट उत्तर दिलं आहे. ती म्हणाली ‘मी रणवीरच्या विरोधात काहीही ऐकणार नाही.’ आलिया सध्या आपल्या डार्लिंग चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच तिच्या डार्लिंग चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे.
ADVERTISEMENT
रणवीस सिंगच्या न्यूड फोटोशूटवर आलिया भट्टची प्रतिक्रिया
या ट्रेलर लॉन्चिंगच्या कार्यक्रमात तिने मध्यमकर्मीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या दरम्यान तिला रणवीर सिंहच्या न्यूडफोटोशूटबद्दल विचारण्यात आलं. या फोटोशूटमुळे नेटकरी त्याला ट्रोल करतायेत, असं एका सांगितलं. यावर बोलताना आलीय म्हणाली, ‘मी माझ्या आवडत्या को-स्टारच्या विरोधात एक शब्द देखील ऐकू शकत नाही. त्याच्या विरोधातबोललेलं मला आवडणार देखील नाही’, असं स्पष्ट शब्दात तिने सांगून टाकलं. त्यामुळे हा प्रश्नच मला सहन होत नसल्याचं देखील ती म्हणाली.
पुढे बोलताना ती म्हणाली की, रणवीर हा आम्हा सगळ्यांचा आवडता कलाकार आहे. त्याने अनेक चित्रपटात चांगलं कामकेलं आहे. त्यामुळे आमचं प्रेम नेहमी त्याच्यासोबत असेल, असं आलिया म्हणाली. आलियाने आणि रणवीरने रॉकी औररानीकी प्रेम कहाणी या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या सह कलाकाराच्या विरोधातऐकणार नाही, असं थेटच आलिया म्हणाली. यापूर्वी अर्जुन कपूर याने सुद्धा रणवीरचे समर्थन केले होते.
हे वाचलं का?
रणवीरच्या नग्न फोटोशूटवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. या फोटोग्राफीमुळे तो मोठ्याप्रमाणात ट्रोल देखील होतोय. त्याचे असे फोटो अनेकांना रुचले नाही. तर नेटकऱ्यांनी त्याचे असे फोटो वापरून अनेक मजेदार मिम्स देखील बनवले. जेसोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत. यापूर्वी अनेक सेलिब्रेटीजनी नग्न फोटोग्राफी केलीय. त्या सर्वांना अशापद्धतीने ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता रणवीर देखील मॅगझीनसाठी केलेल्या न्यूड फोटोग्राफीमुळे चर्चेतआला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT