रणबीरला आलियाने खास फोटो पोस्ट करून दिल्या शुभेच्छा, म्हणाली तुच आहेस माझं….
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. आज रणबीरचा वाढदिवस आहे. या वाढदिवशी आलियाने दोघांचा एक स्पेशल फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. Happy Birthday My Life असं कॅप्शन देत आलियाने पुढे हार्टचा इमोजीही पोस्ट केला आहे. View this post on Instagram A post […]
ADVERTISEMENT
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. आज रणबीरचा वाढदिवस आहे. या वाढदिवशी आलियाने दोघांचा एक स्पेशल फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. Happy Birthday My Life असं कॅप्शन देत आलियाने पुढे हार्टचा इमोजीही पोस्ट केला आहे.
ADVERTISEMENT
या फोटोत काय आहे?
एका नदीच्या किनाऱ्यावर हे दोघे बसले आहेत. सूर्यास्त पाहात आहेत. दोघांचे निवांत क्षण आहेत. दोघंही एकमेकांमध्येच गढून गेल्यासारखे दिसत आहेत. हा फोटो पाठमोरा आहे. याच फोटाला आलियाने कॅप्शन दिलंय Happy Birthday my life. रणबीरला ती आयुष्य मानते आहे. लवकरच हे दोघे लग्न करतील अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहे.
हे वाचलं का?
आणखी एक मोठी चर्चा देखील बी टाऊनमध्ये सुरु आहे. ती म्हणजे आलिया आणि रणबीर हे जोधपूरमध्येच त्यांच्या लग्नासाठी काही खास ठिकाणं पाहत आहेत.
ADVERTISEMENT
जोधपूरमधील त्या दोघांचे फोटो हे सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल हात आहेत. या फोटोमध्ये आलियाने टाय-डाय ग्रीन डेनिम जॅकेट आणि जीन्स परिधान केलेली आहे तर रणबीर हा कॅज्युअल आउटफिटमध्ये आहे. एअरपोर्टहून बाहेर पडताना हे जोडपं कॅमेऱ्यात कैद झालं आणि त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
ADVERTISEMENT
रणबीर आपला 39 वा वाढदिवस आज सप्टेंबरला साजरा करतो आहे. अशावेळी बर्थडेच्या आधी दोघेही जोधपूरमध्ये स्पेशल सेलिब्रेशनसाठी आले आहेत. तसंच लग्नासाठी खास ठिकाण देखील हे दोघं शोधत असल्याची चर्चा आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, लग्नाबाबत रणबीरने एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं होतं की, ‘जर कोरोना नसता तर लग्नं कधीच पार पडलं असतं. आता मी याबाबत काहीही बोलून मला त्या गोष्टीला नजर लागू द्यायची नाही. मी माझ्या आयुष्यातील ते ध्येय लवकरच पूर्ण करायचं आहे.’
रणबीरच्या या वक्तव्यानंतर आलियासोबत त्याचं लग्न होणार अशा बातम्यांनी बराच जोर धरला होता. पण दोघांनीही याबाबत काहीही भाष्य केलं नाही. त्यामुळे आता हे जोडपं जोधपूरमध्ये ‘वेडिंग व्हेन्यू’ पाहण्यासाठी गेल्याची चर्चा किती खरी ठरते याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT