‘Amit Shah तर मोगॅम्बो..’, तळवे चाटल्याच्या टीकेवर ठाकरेंचा पलटवार
Amit Shah is Mogambo Uddhav Thackeray counter attack: मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल पुण्यातील (Pune) एका सभेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जहरी टीका केली. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले अशा शब्दात अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. ज्याला आता उद्धव ठाकरेंनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित […]
ADVERTISEMENT
Amit Shah is Mogambo Uddhav Thackeray counter attack: मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल पुण्यातील (Pune) एका सभेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जहरी टीका केली. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले अशा शब्दात अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. ज्याला आता उद्धव ठाकरेंनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना मोगॅम्बो म्हणत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुंबईतील उत्तर भारतीय समाजासोबत आयोजित चर्चासत्रात मुख्यमंत्री बोलत होते. (amit shah is mogambo uddhav thackeray counter attack on foot palm licking criticism)
ADVERTISEMENT
अमित शाहांना मोगॅम्बो म्हणत उद्धव ठाकरेंनी डिवचलं..
‘काल कोणी तर आलं होतं पुण्यात त्यांनी विचारलं की, काय कसं चाललंय महाराष्ट्रात.. तेव्हा म्हणाले आज चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत त्यांना देऊन टाकलं. तर ते म्हणाले की, खूपच मस्त.. मोगॅम्बो खुश हुआ.. ते मोगॅम्बोच आहेत. मिस्टर इंडियामध्ये मोगॅम्बोला हेच हवं होतं की, लोकं आपआपल्यात लढतील तर आपण देशावर राज्य करू. आजच मोगॅम्बो तेच आहे.’
मंत्री तानाजी सावंतांनी भर कार्यक्रमात असं का केलं? सर्वत्र चर्चा
हे वाचलं का?
‘मी तळवे चाटले असं ते म्हणाले. पण आता त्यांच्यासोबत जे गेले आहेत त्यांचं काय-काय चाटत आहे ते आता काही आपल्याला माहित नाही. हे सरकार एवढं घाणेरडं आणि नीच राजकारण करत आहेत. हे लोकं मला मिळालेलं मशाल हे चिन्ह देखील काढून घेण्याचा प्रयत्न करतील. पण मी काही घाबरणार नाही. कारण माझ्या मनात श्रीराम आहे.’
‘हे जे पंतप्रधान आहेत त्यांच्या मनात हेच आहे की, त्यांच्या दारात लोकांनी यावं आणि इथे भीक मागावी. लोकांनी भिकारी व्हावं.’
ADVERTISEMENT
‘अमित शाह काल आले होते तेव्हा ते म्हणाले की, दूध का दूध और पानी का पानी हो गया.. पण मी म्हणतो त्यांनी दुधात मीठ टाकलंय. पण अद्यापही सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणं बाकी आहे.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनीही अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं.
ADVERTISEMENT
Sanjay Raut: ‘CM.. XXX चाटतायेत का?, राऊतांची जीभ घसरली; शाहांनाही सुनावलं
अमित शाहांनी काय केली होती टीका?
‘कालच एक मोठा विजय आमच्या युतीला मिळाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या दोन्ही गोष्टी मिळाल्या आहेत. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. जी लोकं खोटेपणाच्या आधारावर हुंकार भरत होते त्यांना आज माहित पडलं की, सत्य कोणासोबत आहे.’
‘2019 च्या निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष होतो. निवडणूक आम्ही युतीत लढलो. स्वत:च्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावला. देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली आणि नंतर मुख्यमंत्री बनणण्यासाठी विरोधी विचारधारा असलेल्यांचे तळवे चाटू लागले. आज त्यांनाच सत्य काय आहे ते कळलं आहे.’ अशी टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT