मुंबईच्या रेस्टॉरंटमधील १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. यावर पावलं उचलत पालिका प्रशासनाने शहरात नागरिकांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. बाहेर फिरताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं असून…हॉटेल आणि रेस्टॉरंटनाही कडक नियमावली आखून दिली आहे. अशातच मुंबईच्या अंधेरी भागातील राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

ADVERTISEMENT

पंढरपूर : JCB मधून मिरवणूक, ७६ जणांविरोधात गुन्हा दाखल

१० कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर राधाकृष्ण रेस्टॉरंट ताबडतोक बंद करण्यात आलं आहे. या हॉटेलमध्ये एकूण ३५ जणं कामाला आहेत. सॅनिटायजेशन करवून घेतल्यानंतर नवीन स्टाफची नियुक्ती झाल्यानंतरच हे रेस्टॉरंट सुरु करण्याची परवानगी दिली जाईल अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे मुंबईत हॉटेल आणि रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्याची परवानगी देऊन चूक तर झाली नाही ना अशी चर्चा लोकांमध्ये सुरु आहे.

हे वाचलं का?

राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा, वीजदरांत दोन टक्क्यांची कपात

दरम्यान १० कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांना BKC च्या जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलेलं आहे. तसेच ज्या व्यक्ती या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्या आहेत त्यांना सक्तीचं होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबईत पुन्हा एकदा १ हजारापेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. ५ जणांनी गुरुवारी कोरोनामुळे आपले प्राण गमावले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेने सर्व हॉस्पिटल्सना आपली बेड कपॅसिटी वाढवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये नियमांचं उल्लंघन होत नाहीये ना याची चौकशी करण्यासाठी महापालिकेने भरारी पथकाची स्थापना केली असून या पथकांना हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सरप्राईज व्हिजीट करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT