...अखेर सुप्रिया सुळे अन् अजित पवार एकत्र, पुणे अन् पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जाहिरनाम्याचं प्रकाशन
Supriya Sule and Ajit Pawar : पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता आल्यास राष्ट्रवादी काय करणार? याबद्दल जाहीरनाम्यातून घोषणा करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
...अखेर सुप्रिया सुळे अन् अजित पवार एकत्र
पुणे अन् पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जाहिरनाम्याचं प्रकाशन
Supriya Sule and Ajit Pawar, Pune : पुणे महानगरपालिकेत एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यानंतर अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते देखील एकत्र आले आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता आल्यास राष्ट्रवादी काय करणार? याबद्दल जाहीरनाम्यातून घोषणा करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढत आहे.
अजित पवार म्हणाले, मला जे जमत नाही ते मी तोंडावर सांगतो. कौतुकासाठी सादर केलेला हा जाहीरनामा नाहीये. आता निवडणूक झाल्यावर आम्हाला कुठलं काम नाहीये. साडे तीन वर्ष निवडणूक नाहीत. सुप्रिया सुळे , अमोल कोल्हे आम्ही सगळी काम करणारी माणसे आहोत. आम्ही केलं नाही तर पुणेकर आम्हाला दारात उभं करणार नाहीत. पुणेकरांचा स्वभाव आम्हाला माहिती आहे. कारण आम्ही पण पुणेकर आहोत. पुणेरी पाट्या तर जगप्रसिद्ध आहेत.
राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात 8 अजित पवारांचे वादे
नळाद्वारे दररोज पाणी
ट्रॅफिकमुक्त, खड्डे मुक्त पीएमसी










