बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती, भाजपचा वादग्रस्त निर्णय

मिथिलेश गुप्ता

Maharashtra Politics : ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी, शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याचा नंतर पोलिसांनी एन्काऊंटर केला आणि त्याच्या मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

Maharashtra Politics
Maharashtra Politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती

point

भाजपचा वादग्रस्त निर्णय

Maharashtra Politics , बदलापूर : बदलापूरमधील बहुचर्चित बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटे यांची भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या या निर्णयामुळे केवळ बदलापूरच नव्हे, तर राज्यभरात राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी, शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याचा नंतर पोलिसांनी एन्काऊंटर केला आणि त्याच्या मृत्यू झाला होता. मात्र तपासात हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसल्याचे समोर आले. अत्याचाराची माहिती दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा : ...अखेर सुप्रिया सुळे अन् अजित पवार एकत्र, पुणे अन् पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जाहिरनाम्याचं प्रकाशन

गुन्हा दाखल होताच कोतवाल आणि आपटे हे दोघेही फरार झाले होते. तब्बल 40 दिवसांनंतर ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने कर्जत येथील एका फार्महाऊसमधून त्यांना अटक केली. त्यानंतर अवघ्या 48 तासांत तुषार आपटे यांना जामीन मंजूर झाला. सध्या या प्रकरणाची सुनावणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp