अमरावती:कंटेनमेंट झोनमधील प्रत्येक घर तपासा, केंद्रीय पथकाची सूचना
अमरावती: अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांचे आधिक्य असलेल्या परिसराला कंटेनमेंट झोन घोषित करून तेथे घरोघर तपासणी मोहिम राबविण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने दिले आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने अमरावती विभागातील कोरोना वाढीची कारणे जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाकडून केंद्रीय सहसचिव निपुण विनायक, एनसीडीसीचे उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी, तज्ज्ञ डॉ. आशिष रंजन यांची टीम नियुक्त करण्यात आली. यावेळी केंद्रीय सहसचिव निपुण […]
ADVERTISEMENT
अमरावती: अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांचे आधिक्य असलेल्या परिसराला कंटेनमेंट झोन घोषित करून तेथे घरोघर तपासणी मोहिम राबविण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने दिले आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने अमरावती विभागातील कोरोना वाढीची कारणे जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाकडून केंद्रीय सहसचिव निपुण विनायक, एनसीडीसीचे उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी, तज्ज्ञ डॉ. आशिष रंजन यांची टीम नियुक्त करण्यात आली.
ADVERTISEMENT
यावेळी केंद्रीय सहसचिव निपुण विनायक यांनी डॉक्टरांच्या एका टीमशी चर्चा करून येथील परिस्थितीची माहिती घेतली. अकोला जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांकडून अकोला जिल्ह्याची माहितीही त्यांनी घेतली.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत गर्दी टाळणे सर्वात आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक आणखी गर्दी कशी कमी करता येईल, यादृष्टीने अंमलबजावणी व्हावी. जिथे रूग्ण अधिक प्रमाणावर आढळून येत आहेत, तिथे कंटेनमेंट झोन घोषित करून लगेच सर्वेक्षण करून घरोघर तपासणी करावी, असे निर्देश विनायक यांनी दिले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पोलीस यंत्रणा यांच्यात उत्तम समन्वय असणे गरजेचे आहे. कोरोनाला रोखण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करावे, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
हे वाचलं का?
दरम्यान, या बैठकीनंतर त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन केंद्रीय सहसचिवांनी कोरोना रुग्णांसाठी असलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. यानंतर त्यांनी शहरातील श्रीकृष्णपेठ येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT