प्रेयसीच्या नातेवाईकावर रोखली बंदूक, हवेत गोळीबार करत तरुणीला नेलं पळवून

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रेमात पडल्यानंतर घरातून होणारा विरोध नवा नाही. घराच्यांना विरोध दूर व्हावा म्हणून अनेक जण वेगवेगळे मार्ग शोधतात, पण तरीही घरातील लोक तयार होत नसतील, तर मग…? अमरावतीत अशीच एक फिल्मी स्टाईल घटना घडली आहे. अमरावतीमध्ये सोमवारी (७ मार्च) रात्री बाराच्या सुमारास घडला.

ADVERTISEMENT

प्रेयसीला पळवून नेण्यासाठी नागपूरमधील प्रियकराने चक्क तरुणीच्या नातेवाईकाच्या डोक्याला बंदूक लावली. हवेत गोळीबार करून प्रेयसीला प्रियकर पळून घेऊनही फरारही झाला. या प्रकाराने तरुणीकडचे नातेवाईक मात्र चांगलेच हादरले. ही फिल्मी स्टाईल घटना अमरावतीत मध्यरात्री घडल्याने खळबळ उडाली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. आणखी दोन आरोपी फरार आहेत.

काय आहे प्रकरण ?

हे वाचलं का?

नागपूरमधील एक तरुणी घरगुती कार्यक्रमासाठी अमरावती शहरातील बालाजी प्लॉटमधील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. काल (७ मार्च) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सर्व कुटुंबिय जेवण करून बसले होते. तितक्यात आरोपी प्रियकर हा अन्य साथीदारांसोबत दुचाकी घेऊन तरुणीच्या नातेवाईकांच्या घराजवळ पोहचला.

यावेळी त्याने त्याच्या प्रेयसीला सोबत येण्याची गळ घातली होती,पण त्या तरुणीचे नातेवाईक त्याला विरोध करत होते. यावेळी आरोपी प्रियकराने तरुणीच्या नातेवाईकांपैकी एकाच्या डोक्याला बंदूक लावली. जिवे मारण्याची धमकी देत हवेत गोळीबार करून दहशत पसरवली. या संपूर्ण प्रकाराने तरुणीचे नातेवाईक चांगलेच घाबरले. त्यानंतर प्रियकर त्याच्या साथीदारांसह प्रेयसीला सोबत घेऊन नागपूरच्या दिशेन निघून गेले.

ADVERTISEMENT

त्यानंतर लागलीच तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांना संपर्क केला. यावेळी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी व त्यांच्या साथीदारांचा पाठलाग केला. यावेळी पोलिसांनी नांदगाव टोल नाका परिसरातून आरोपी साथीदार प्रफुल दामाये व रमेश अतपाका (रा. नागपूर) यांना अटक केली. आरोपी प्रियकर व त्या तरुणीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

ADVERTISEMENT

आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे

अमरावती शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. हवेत गोळीबार करणारा आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती तरुणीच्या नातेवाइकांनी दिली. या पूर्वीही त्याच्यावर नागपूरमध्ये गुन्हा दाखल असल्याची माहितीही तरुणीच्या नातेवाईकांनी दिली. राजापेठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT