लव्ह जिहाद : तरुणीच्या आरोपामुळे पोलिसांवर आगपाखड करणाऱ्या नवनीत राणा पडल्या तोंडघशी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावतीत मुलगी बेपत्ता झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप केला. मुलीला शोधण्यावरून आणि कॉल रेकॉर्ड केल्यानंतर नवनीत राणांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांवर आगपाखड केली. पण, तरुणी सापडली आणि कथित लव्ह जिहाद प्रकरणाची हवा निघाली. आता सापडलेल्या तरुणीने राणांवरच बदनामीचा आरोप केला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या राणा आता तोंडघशी पडल्याची चर्चा सुरू झालीये.

ADVERTISEMENT

अमरावतीमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मुलीच्या आईवडिलांनी याप्रकरणात मदत करावी म्हणून म्हणून खासदार नवनीत राणा यांना विनंती केली. त्यानंतर नवनीत राणा यांनी हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा केला.

नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची

नवनीत राणांनी राजापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याला फोन केला. अधिकाऱ्यांने कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करत नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. त्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्राभर चर्चेत आलं.

हे वाचलं का?

‘माझा कॉल रेकॉर्ड का केला?’ ‘लव्ह जिहाद’वरून नवनीत राणांचा पोलिसांशी वाद; नक्की काय घडलं?

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं. त्यावरूनही नवनीत राणांनी पोलिसांना सवाल केले होते. मुलीशी जबरदस्तीने आंतरधर्मीय लग्न केल्याचा दावा राणांनी केला होता. याच प्रकरणावरून खासदार नवनीत राणांनी पोलिसांवर आगपाखड केली. पोलीस अधिकारी आणि राणा यांची शाब्दिक बाचाबाचीही झाली.

ADVERTISEMENT

नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा केला, मात्र बेपत्ता तरुणी सापडल्यानंतर या दाव्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं.

ADVERTISEMENT

Navneet Rana Vs Shiv sena : नवनीत राणा आणि शिवसेनेत संघर्षाची ठिणगी कधी पडली?

अमरावती प्रकरण : तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप

६ सप्टेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता तरुणीचा शोध सुरू केला होता. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी पहाटे ही तरुणी सातारा येथे आढळून आली . त्यानंतर तिला अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.

तरुणीने पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. ‘आईवडिलांशी वाद झाला होता. शिक्षण घेण्यासाठी मी घरातून रागाच्या भरात निघून गेले होते. मला कुणीही पळवून नेलं नाही आणि लग्नही केलं नाही. माझी बदनामी थांबवा. नवनीत राणांनी खोटी माहिती दिली आहे. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून माझी बदनामी केली जात आहे”, असा आरोप या तरुणीने केला आहे.

रामदेव बाबाच्या शिबिरात भेट अन्…; नवनीत राणा आणि रवी राणांच्या लव्हस्टोरीचा किस्सा

तरुणी सापडल्यानंतर नवनीत राणांचं मौन

हनुमान चालीसा पठणानंतर नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा मुद्दा उचलला आहे. अमरावतीत याच प्रकरणाचा दावा करत राणांनी पोलीस ठाण्यात आदळआपट केली. मात्र, बेपत्ता तरुणीने संपूर्ण खुलासा केल्यानंतर प्रकरण निवळलं आहे. आता तरुणीने केलेला खुलासा आणि आरोपानंतर नवनीत राणांनी मौन धरलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT