माजी गृहमंत्री अनिल देशमुख हनीमूनला गेले का? अमृता फडणवीसांचा खोचक प्रश्न
अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून कुठे आहेत ते कुणालाच माहित नाही. त्यांच्याबाबत सरकारनेही काही सांगितलेलं नाही. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप झाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हे आरोप केले होते. मात्र आता हे दोघेही कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. अशात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
ADVERTISEMENT

अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून कुठे आहेत ते कुणालाच माहित नाही. त्यांच्याबाबत सरकारनेही काही सांगितलेलं नाही. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप झाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हे आरोप केले होते. मात्र आता हे दोघेही कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. अशात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक खोचक प्रश्न मविआ सरकारला विचारला आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काय हनीमूनला गेले आहेत का? असा खोचक प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारला आहे. एक माजी पोलीस कमिश्नर आणि माजी गृहमंत्री कुठे हनीमूनला गेले आहेत माहित नाही. तुम्हाला कुठे दिसले तर तुम्ही पण रिपोर्ट करा, म्हणजे त्यांना पकडता येईल. असं त्या पत्रकारांना उद्देशून म्हणाल्या.
‘इथे लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. कारण कोणी दिलंय, लोकांनीच दिलंय ना. यावर काम करावं की नाही करावं, महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल बनावा हे आपल्यालाच ठरवायचं आहे. यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते कुठून येतंय, त्याचं नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते’ असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.