रागाच्या भरात आईने बाळाला विष पाजून मारलं, आत्महत्येचाही प्रयत्न, नागपुरातली धक्कादायक घटना
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर नागपूर जिल्ह्यातल्या रामेटकमध्ये असलेल्या बनपुरी गावात घरगुती वादातून आलेल्या रागातून महिलेने बाळाला विष पाजलं आणि स्वतःही विष प्यायली. या घटनेत लहान बाळाचा मृत्यू झाला आहे. 14 जानेवारीला ही घटना घडली आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महिलेची प्रकृती गंभीर आहे तिला रामटेक येथील योगीराज रूग्णालयात दाखल करण्यात आलं […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
नागपूर जिल्ह्यातल्या रामेटकमध्ये असलेल्या बनपुरी गावात घरगुती वादातून आलेल्या रागातून महिलेने बाळाला विष पाजलं आणि स्वतःही विष प्यायली. या घटनेत लहान बाळाचा मृत्यू झाला आहे. 14 जानेवारीला ही घटना घडली आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महिलेची प्रकृती गंभीर आहे तिला रामटेक येथील योगीराज रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ठाणे : आईने पाच महिन्याच्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकलं, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
महिलेचं नाव प्रणाली रामकृष्ण धावडे असं आहे. ती 22 वर्षांची आहे, तिने तिच्या 17 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं. त्यानंतर स्वतःही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या बाळाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. या घटनेमुळे बनपुरी गावावर शोककळा पसरली आहे. या सगळ्या सून्न करणाऱ्या वातावरणातच बाळाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.