बदनामी प्रकरणी माफी मागा अन्यथा.., संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली कायदेशीर नोटीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कायदेशीर नोटीस धाडली आहे. काही दिवसांपूर्वी PMC बँक घोटाळ्यातील पैसे शिवसेना नेते संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळाले असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या प्रकरणी ही नोटीस धाडण्यात आली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

‘माझ्या विरोधात आणि माझ्या पत्नीच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी चुकीचे आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांना काहीही आधार नाही. असे बिनबुडाचे आरोप करून चंद्रकांत पाटील यांनी माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी केली आहे. याप्रकरणी जर त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही तर मी पुढची कायदेशीर कारवाई करेन आणि कोर्टात जाईन’ असं संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील यांनी काय आरोप केला होता?

संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात असं लिहिलं की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावलं आणि ईडीशी लढताना तुमच्या तोंडाला फेस येईल असं म्हटलं. पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला? संजय राव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो अनुभव येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की हा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले 50 लाख रूपये मिळाले. त्याआधी बेहिशेबी प्राप्तीबाबत ईडीने नोटीस बजावली ज्यानंतर तुम्ही हैराण झाला होतात. अखेर बरीच धावपळ करून आणि पैसै देऊन ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सगळं पाहिल्यावर मी अंदाज बांधला जर 50 लाखांसाठी इतका त्रास होत असेल तर 127 कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असं त्रैराशिक मांडून मी लिहिलं होतं. मात्र मला ईडीचा अनुभव नाही हे खरंच आहे’ असं संजय राऊत यांना पाठवलेल्या पत्रात चंद्रकांत पाटील म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

‘चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकू, त्यांची तेवढीच…’, राऊतांनी उडवली खिल्ली

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील यांना संजय राऊतांनी काय उत्तर दिलं होतं?

‘चंद्रकांत पाटलांचं पत्र आम्ही छापलं यातच तुम्हाला काय ते समजलं पाहिजे. चंद्रकांत पाटील त्यांच्याच सापळ्यात अडकले आहेत. भाजपचे लोकं त्यांच्याच सापळ्यात अडकत असतात. त्यांनी पत्रात आरोप केले आणि ते पत्र आमच्याकडे पाठवलं. आमच्यावर टीका असतानाही आम्ही ते पत्र काना-मात्र न बदलता छापलं.’

‘प्रचंड टीका आणि घाणेरड्या शब्दात टीका आहे. पण त्यांची ती संस्कृती आहे. सध्याच्या भाजपची.. पूर्वीच्या नाही. पण त्या पत्रात त्यांनी जे काही दळभद्री आरोप केलेले आहेत आमच्या संदर्भात.. त्याबाबत मी चंद्रकांत पाटलांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.’

‘आम्ही त्यांच्यावर दावा ठोकणार आहोत. पण इतर लोकं लावतात तसा 100 कोटी, 50 कोटी असा दावा नाही लावणार.. सव्वा रुपयांचा दावा ठोकू.. त्यांची तेवढीच ताकद आहे. सव्वा रुपया.. ते सव्वा रुपयावालेच आहेत. मला नको 100 कोटी.. ज्यांना हवे ते दावे लावतात. ज्यांची जेवढी लायकी तेवढाच दावा लावायचा.’ असं म्हणत संजय राऊत यांनी एकप्रकारे चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांची खिल्लीच उडवली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT