iPhone 13 बाजारात! किंमत किती? भारतात कधीपासून मिळणार…
अॅपल ग्राहकांचं लक्ष लागलेला iPhone 13 अखेर लॉन्च करण्यात आला. एका व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे कंपनीनं नवीन उत्पादन मंगळवारी लॉन्च केली. यात आयफोन सीरीजबरोबर आयपॅड, आयपॅड मिनी, अॅपल वॉच सीरीज ७ आदींचा समावेश आहे. जुन्या आयफोनच्या तुलनेत नवीन आयफोन अधिक अॅडव्हान्स (अदययावत) आहे. आयफोन १३ मिनी व आयफोन १३ भारतात २४ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आयफोन […]
ADVERTISEMENT

अॅपल ग्राहकांचं लक्ष लागलेला iPhone 13 अखेर लॉन्च करण्यात आला. एका व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे कंपनीनं नवीन उत्पादन मंगळवारी लॉन्च केली. यात आयफोन सीरीजबरोबर आयपॅड, आयपॅड मिनी, अॅपल वॉच सीरीज ७ आदींचा समावेश आहे. जुन्या आयफोनच्या तुलनेत नवीन आयफोन अधिक अॅडव्हान्स (अदययावत) आहे.
आयफोन १३ मिनी व आयफोन १३ भारतात २४ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आयफोन १३ प्रो हा ३० ऑक्टोबर, तर आयफोन १३ प्रो मॅक्स हा १३ नोव्हेंबरपासून भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे.
अॅपलने आयफोन १३ सीरीजचे ४ मॉडेल लॉन्च केले आहेत. यात आयफोन १३ मिनी, आयफोन १३, आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स आदींचा समावेश आहे. अॅपलने आयफोन १३ मिनी आणि आयफोन १३ यांना एका श्रेणीत ठेवलं आहे.