अर्जुन मलायका एकत्र लंच डेटवर, ब्रेक अपच्या चर्चांना फुलस्टॉप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांमध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. अशात अर्जुन मलायका यांचा लंच डेटचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या ब्रेक अपच्या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे. दोघांचं ब्रेक अप झालं आहे. मलायकाने स्वतःला घरात कोंडून घेतलं आहे अशा सगळ्या बातम्या येत होत्या. मात्र हे दोघे लंच डेटला एकत्र भेटल्याचा फोटो समोर आला आणि या सगळ्या बातम्या म्हणजे अफवा होत्या हे सिद्ध झालं आहे.

ADVERTISEMENT

नुकतंच मलायका आणि अर्जुन कपूर या दोघांना मुंबईतल्या एका रेस्तराँच्या बाहेर स्पॉट केलं गेलं आहे. लंच डेट साठी हे दोघे भेटले होते. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की या दोघांचं ब्रेक-अप वगैरे काहीही झालेलं नाही. लंच डेटसाठी मलायका खास पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आली होती. तर अर्जुन कपूर ब्लू कपूरच्या हुडीमध्ये दिसला. दोघांचा हा फोटो समोर आल्याने त्यांच्या ब्रेक अपच्या चर्चा संपल्या आहेत.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर त्याची बहीण रिया कपूरच्या घरी गेला होता. तिथे डिनर होते मात्र मलायका तिथे गेली नव्हती. मलायका आणि रिया यांची घरं जवळजवळ आहेत. मात्र तरीही अर्जुन कपूर मलायकाच्या घरीही गेला नाही. बऱ्याचदा अर्जुन कपूर आणि मलायका फॅमिली डिनर्ससाठी सोबत जात असतात. यावेळी असं झालं नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अर्जुन कपूर जेव्हा त्याच्या बहिणीच्या घरी जातो तेव्हा मलायकाच्या घरी जातो. मात्र अर्जुन यावेळी रियाच्या घरून परत आला. अर्जुन कपूर आणि मलायका कॉफीसाठी किंवा डेटवरही जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांना स्पॉटही करण्यात आलेलं नाही. त्यामुळे अर्जुन आणि मलायका यांचं ब्रेक अप झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र या दोघांचा फोटो समोर आल्याने सगळ्या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT