मॅरेज हॉल, अपार्टमेंट, आलिशान फ्लॅट्स अन् बरच काही…, अर्पिता मुखर्जी अशी झाली करोडोंची मालकीण
बंगालमधिल शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेले माजी मंत्री पार्थ चॅटर्जींची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या संबंधित तीन कंपन्यांची ईडीच्या चौकशी सुरु आहे. पार्थ यांच्याशी संबंधीत असल्याने अर्पिताला या कंपन्यांमध्ये संचालक बनवण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. ईडीने 22 जुलै रोजी अर्पिताच्या दोन खोल्यांच्या अपार्टमेंटवर छापा टाकला तेव्हा 21 कोटी 90 लाखांची रोकड, सोन्याचे दागिने आणि विदेशी […]
ADVERTISEMENT

बंगालमधिल शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेले माजी मंत्री पार्थ चॅटर्जींची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या संबंधित तीन कंपन्यांची ईडीच्या चौकशी सुरु आहे. पार्थ यांच्याशी संबंधीत असल्याने अर्पिताला या कंपन्यांमध्ये संचालक बनवण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
ईडीने 22 जुलै रोजी अर्पिताच्या दोन खोल्यांच्या अपार्टमेंटवर छापा टाकला तेव्हा 21 कोटी 90 लाखांची रोकड, सोन्याचे दागिने आणि विदेशी चलन सापडले होते. पाच दिवसांनंतर, ईडीने अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका अपार्टमेंटमधून 27 कोटी 90 लाख कॅश, पाच कोटींचे सोने आणि विदेशी चलन जप्त केले. पार्थ चॅटर्जी यांनी अर्पिताला कोलकाता येथील 3 कंपन्यांचे संचालक बनवल्याची माहिती आहे.
अर्पिता मुखर्जीच्या ‘त्या’ तीन कंपन्या फक्त कागदावरच
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार ते या प्रकरणाच्या खोलाशी गेले. सिम्बायोसिस मर्चंट प्रायव्हेट लिमिटेड, सेंट्री इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि ईचे एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे केवळ कागदावरच काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
कंपनीच्या कागदपत्रांनुसार, 21 मार्च 2011 पासून, सिम्बायोसिस मर्चंट प्रायव्हेट लिमिटेड विविध प्रकारच्या वस्तूंच्या व्यापारात गुंतलेली आहे. या कंपनीत कल्याण धर नावाच्या व्यक्तीला 1 जुलै 2021 रोजी सहसंचालक बनवण्यात आले होते.