SRK’s Son: आर्यन खान 4 वर्षांपासून करत होता ड्रग्सचं सेवन, NCB समोर ढसाढसा रडला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्स पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने त्याला रविवारी अटक केली आहे. तेव्हापासून ड्रग्ज प्रकरणात त्याची चौकशी केली जात आहे. चौकशी आर्यन खान हा पूर्णपणे हतबल झाल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. या चौकशीत आर्यनने कबूल केलं आहे की, तो तब्बल 4 वर्षापासून ड्रग्सचं सेवन करत होता. दरम्यान, चौकशी सुरु असताना आर्यनला आपले अश्रू आवरता येत नव्हते आणि तो वारंवार रडत होता.

ADVERTISEMENT

शाहरुखसोबत आर्यनची फोनवरुन बातचीत

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यनशी फोनवर बोलला आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याचे वडील शाहरुख खानशी त्यांच्या लँडलाईन फोनवरून सुमारे 2 मिनिटे बोलण्यास परवानगी दिली होती.

हे वाचलं का?

देशाबाहेर असतानाही केलं आहे ड्रग्सचं सेवन

एनसीबीच्या चौकशीत असे उघड झाले की, आर्यन हा तब्बल 4 वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत आहे आणि आर्यनने भारताबाहेर म्हणजेच यूके-दुबई किंवा इतर देशांमध्ये ड्रग्जचे सेवन केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच गंभीर झालं आहे. यामुळेच NCB कडून सातत्याने आर्यनची वेगवेगळ्या प्रकारे चौकशी सुरु आहे.

ADVERTISEMENT

यापूर्वी, एनसीबीने क्रूझमधील त्यांच्या छाप्याबद्दल आणि तेथून जप्त केलेल्या ड्रग्सबाबात निवेदन जारी केले होते. एनसीबीने टिपच्या आधारावर क्रूझवर कारवाई केली होती. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी आरोपींकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमए (एक्स्टसी) च्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये जप्त केले आहेत. .

ADVERTISEMENT

त्याचवेळी, एका लेखी निवेदनात आर्यन खानने आपला अटक मेमो स्वीकारताना असे म्हटलं आहे की, ‘मला माझ्या अटकेची कारणे समजली आहेत आणि माझ्या कुटुंबीयांना त्याबद्दल कळवले आहे.’

आर्यन ड्रग्स विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याचा NCB ला संशय

एनसीबीने या प्रकरणातील आर्यन, अरबाज मर्चंट आणि इतर आरोपींचे फोन जप्त केले आणि सर्व चॅट्स तपासले आहेत. त्या तपासात आर्यन अनेक ड्रग पेडलर आणि ड्रग सप्लायर्सच्या संपर्कात असल्याचं NCB कडून सांगण्यात येत आहे. त्या पुराव्याच्या आधारावर, NCB ने आर्यन आणि अरबाज दोघांना समोरासमोर बसवले आणि एकमेकांना अनेक प्रश्नं विचारले.

Cruise Drugs Party: ड्रग्स केसमध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानला मिळणार जामीन?

आर्यनने काय दिलं होतं स्पष्टीकरण?

एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आर्यनने आपण क्रूझवर का गेलो होतो याचं आता स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने एनसीबीला सांगितले की, तो फक्त ‘गेस्ट’ म्हणून क्रूझवर गेला होता. तशाच स्वरुपात त्याला आमंत्रित करण्यात आले होतं आणि त्यासाठी त्याने कोणतेही पैसे घेतले नाहीत. आर्यनने असाही दावा केला होता की, त्या पार्टीत त्याच्या नावाने लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT