Pathaan : दीपिकाचं बेशरम रंग गाणं लागताच कपडे फाटूस्तर हाणामारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pathaan Movie : पठाण चित्रपटावरून (Pathaan Movie) बरेली येथील एका मॉलमध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यादरम्यान अनेक जण गंभीर जखमी झाले. या मारामारीमुळे संपूर्ण मॉलमध्ये (Shoping Mall) एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) पूर्ण ताकदीनिशी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Video Viral On Social Media) ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.

Pathan : “…नाहीतर आम्ही ‘बांबू’ लावू”, मनसेचा थिअटर्स मालकांना इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीतील एका मॉलमध्ये पठाण चित्रपटही सुरू होता. दीपिकाच्या भगव्या बिकिनीमध्ये ‘बेशरम’ गाणे येताच काही खोडकरांनी विचित्र कमेंट करण्यास सुरुवात केली आणि मोबाईलवरून चित्रपटाचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. सिनेमा हॉलच्या कर्मचार्‍यांनी व्हिडिओ बनवणे थांबवले आणि ते नियमांच्या विरोधात असल्याचे सांगितले. यावरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Pathaan : प्रचंड विरोधानंतरही ‘पठाण’ने पहिल्या दिवशी केली विक्रमी कमाई

अनेकजण ताब्यात

गोंधळाची माहिती मिळताच इजतनगर पोलीस दलही घटनास्थळी पोहोचले आणि काही लोकांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रकरण मिटले. सिनेमा हॉलमध्ये तैनात केलेल्या बाऊन्सर्सनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याचे कपडे फाडले.

ADVERTISEMENT

सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपी मुलांची ओळख पटवत आहेत. इज्जतनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अरुण श्रीवास्तव सांगतात की, सिनेमागृहात मारहाण करणाऱ्या तरुणांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अनेक मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. यासोबतच काही मुलांचीही ओळख पटली आहे. गंभीर जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

अनेक ठिकाणी निदर्शनं

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा पठाण चित्रपट बुधवारी देशभरात प्रदर्शित झाला. वाद आणि निदर्शने दरम्यान, सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी होत आहे. सिनेमागृहांमध्ये अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. बिहारमधील भागलपूरपासून ते मध्य प्रदेशातील इंदूर आणि ग्वाल्हेर, छत्तीसगडमधील दुर्ग, बिलासपूर आणि रायपूर, राजस्थानमधील जयपूर आणि कर्नाटकातील बेंगळुरूपर्यंत विरोधाची ठिणगी पोहोचली.

मुंबई, कानपूर सारख्या अनेक शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. काही ठिकाणी पोस्टर फाडून जाळण्यात आले तर काही ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. याउलट अनेक ठिकाणी शाहरुख खानच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जल्लोष साजरा केला. पण हा गोंधळ फक्त पठाणपुरता मर्यादित नव्हता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT