मोहिते पाटलांचा पताकाधारी अश्व बलराज आषाढी वारीच्या प्रस्थानासाठी रवाना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अकलुज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा मानाचा पताकाधारी अश्व बलराज आषाढी वारीच्या प्रस्थानासाठी रवाना झाला. वारीसाठी वर्षभर बलराजला विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर रिंगणाची प्रशिक्षणही देण्यात आलीये.

ADVERTISEMENT

देहू ते पंढरपूर असा आषाढी पायी वारीचा प्रवास असणारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी देहुच्या वाड्यातून प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यात अश्वाच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी ३० वर्षांपूर्वी सुरु केला. त्यांच्या पश्चात डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या आई पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी अश्वसेवा सुरुच ठेवली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आषाढी वारीसाठी मोहिते पाटील यांचा बलराज अश्वाची वर्षभर देखभाल अश्व प्रशिक्षक पहात असतात वर्षभर बलराजला हरभरा, गुळ, दुध, तूप, गव्हाचा भूस्सा असा खुराक दिला जातो.

आषाढी वारीसाठी रवाना होण्यापूर्वी महिनाभर आधी खुराकाबरोबर शिजवलेली बाजरी, मल्टीव्हिटॅमिन, प्रोटीन व कॅल्शियमयुक्त असे विशेष खाद्य दिले जाते. बलराजची तेलाने मालिश करुन सर्वांग तगडे केले जाते. त्याचबरोबर गोल रिंगणाकरीता धावण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलंय.

ADVERTISEMENT

विठू भेटीची आस! विठ्ठलनामाच्या जयघोषात निवृत्तीनाथ पालखीचे प्रस्थान

ADVERTISEMENT

आषाढी वारीसाठी रवाना झालेला बलराज अश्व हा महाराणा प्रताप यांच्याकडे असलेल्या अश्व चेतक याच्या रक्त गटातील आहे. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेण्यासाठी बरोबर डॉक्टर व ५ जणांची टीम असणार आहे. वारीच्या वाटेवर त्याला हिरवा चारा, गहु भुस्सा, दूध, तूप, हरभरा, गुळ असा खुराक दिला जाणार आहे. बलराजची महिनाभर विशेष निगा ठेवून शिकवण देण्यात आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT