चव्हाणांचा शिंदेंबद्दल गौप्यस्फोट, पण चंद्रकांत खैरेंच्या विधानानं संजय शिरसाट अडचणीत?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला. त्यांच्या विधानावर प्रतिक्रियाही आल्या आहेत. पण, या वादात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट अडकण्याची चिन्हं आहेत. त्याला कारण ठरलं चंद्रकांत खैरे यांचं विधान. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून चर्चेत आहेत. शिंदेंच्या बंडानंतर थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजबाजूच्या नेत्यांवर निशाणा […]
ADVERTISEMENT
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला. त्यांच्या विधानावर प्रतिक्रियाही आल्या आहेत. पण, या वादात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट अडकण्याची चिन्हं आहेत. त्याला कारण ठरलं चंद्रकांत खैरे यांचं विधान.
ADVERTISEMENT
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून चर्चेत आहेत. शिंदेंच्या बंडानंतर थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजबाजूच्या नेत्यांवर निशाणा साधणारे शिरसाट हे शिंदे गटातील पहिले आमदार होते.
तेव्हापासूनच संजय शिरसाट राज्याच्या राजकीय वर्तुळात सातत्यानं चर्चेत राहत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होतील, असं म्हटलं गेलं. पण, शिरसाटांना डावललं गेलं. शिंदे गटाने जाहीर केलेल्या नेते पदाच्या वर्णीतून शिरसाटांना दूर ठेवलं गेलं. त्यानंतर आता पुन्हा सगळ्यांचं लक्ष्य शिरसाटांकडे गेलंय.
हे वाचलं का?
Ashok Chavan: देवेंद्र फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी शिंदेंच काँग्रेसकडे आले होते
अशोक चव्हाणांचा आरोप चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांबद्दल काय म्हणाले?
अशोक चव्हाण यांनी शिवसेनेबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार असतानाच भाजप-शिवसेना यांच्यात आपापसात वाद सुरू होते. त्याचवेळी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. जे शिष्टमंडळ प्रस्ताव घेऊन आलं होतं, त्यात एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता, असं चव्हाणांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT
चव्हाणांच्या याच विधानाला चंद्रकांत खैरेंनी दुजोरा देताना संजय शिरसाटांचा दाखला दिलाय. अशोक चव्हाण खरं बोलले. पृथ्वीराज चव्हाणांकडे एकनाथ शिंदेंनी खूप चकरा मारल्या. हेही मला माहितीये. ते १० ते १५ आमदारांना घेऊन गेले होते, असं त्यावेळचे मित्र संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं, असं खैरेंनी म्हटलंय. संजय शिरसाट यांचं माझ्याकडे वारंवार येणं-जाणं असायचं. त्यांनीच मला एकनाथ शिंदे काँग्रेसकडे गेल्याचं सांगितलं होतं, असं खैरेंनी म्हटलंय.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे भाजपसोबत कसे गेले, हे ईडीचे संचालक सांगू शकतील; राऊतांनी शिंदेंना घेरलं?
संजय शिरसाट सध्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहे. संजय शिरसाटांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. त्यामुळे त्यांच्या शिवसेनेतील परतीचे मार्ग बंद झाल्याची स्थिती आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातही त्यांना बाजूला टाकल्याचं चित्र आहे. त्यातच खैरेंनी शिरसाटांबद्दल विधानाने आता संजय शिरसाटांवर एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाकडे खुलासा करण्याची वेळ आणलीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT